Samarjeetsinh Ghatge, गडहिंग्लज : "पालकमंत्री मागच्या दरवाज्यातून पळून गेले. तिकडे लोटांगण घातलं आणि पवार साहेबांची निष्ठा विकली. अशा गद्दारांना गाडण्याची निवडणूक आली आहे. एकदा म्हणाले पवार साहेब माझे विठ्ठल आहेत, किती वेळा विठ्ठल बदलणार आहात", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समरजीत घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केलाय. ते गडहिंग्लजमधील सभेत बोलत होते.
समरजीत घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफांना सर्वात जास्त पद शरद पवार साहेबांनी दिली. मुश्रीफांवर ईडीची धाड पडली, तेव्हा त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते समोर आले. त्यांनी पोलिसांना येऊ दिलं नाही. माझे साहेब , माझे साहेब म्हणून पोलिसांच्या लाठ्या खाल्ला, पण साहेबांना हात लावू देणार नाही म्हणाले. त्यावेळी माझ्यावरही आरोप केले गेले. पुरोगामी विचाराचे आहेत, म्हणून त्यांच्यावर रेड पडली, असंही म्हटलं गेलं. मात्र, आदरणीय पालकमंत्री मागच्या दरवाज्यातून पळून गेले. तिकडे लोटांगण घातलं आणि पवार साहेबांची निष्ठा विकली. अशा गद्दारांना गाडण्याची निवडणूक आली आहे.
समरजीत घाटगे पुढे बोलताना म्हणाले, स्वर्गिय मंडलिक साहेबांनी रक्ताच्या वारसाला बाजूला ठेऊन त्यांना मंत्री आणि आमदार केलं. सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे नाव बदलून हसन मियालाल मुश्रीफ करायचं, असा त्यांचा मानस होता. स्वर्गिय कुपेकर साहेबांनी त्यांना पुढे आणलं त्याच्यासोबत देखील गद्दारी केली. ज्यांच्या पाठीवर खंजीर खुपसला ते सर्व माणसं आज योगायोगाने आपल्या व्यासपीठावर गोळा झाली आहेत. इथं आज एक माणसू नाही ज्यांच्या पाठीत मुश्रीफांनी खंजीर खुपसल नाही. आता आपल्या सर्वांना निर्णय घ्यायचा.
शाहू महाराज म्हणाले, कागलमध्ये लोकसभेला विरोधकानी म्हटलं होतं की शाहू महाराज यांच्यावर दोन लाखाचे लीड असेल, पण विरोधकांची सगळी गणित बिघडली. कागल आणि महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. महाराष्ट्राची जनता हे परिवर्तन करेल यात शंका नाही. समरजित घाटगे हे स्वतः सी ए आहेत त्यामुळे त्यांना गणित चांगलं कळत. आपल्याला महाराष्ट्र खंडणी मुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कागल करायचं आहे. मी पुरोगामी आहे असं काहीजण म्हणत होते, मात्र शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोडून गेले. आपल्या लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये देणार आहोत. महाराष्ट्राला एक नंबर राज्य आणायचे आहे त्यासाठी समरजित घाटगे यांना निवडून द्या, असं आवाहनही शाहू महाराज यांनी केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या