Share Market Crash : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024 Result) अपेक्षित निकाल न आल्यामुळे भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड झाली आहे. आज सत्र चालू होताच शेअर बाजार गडगडायला सुरुवात झाली होती. आता दुपारपर्यंत याच शेअर बाजाराने जास्तच बुडी घेतली. दरम्यान, शेअर बाजाराचे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हे दोन्ही निर्देशांक अभूतपूर्व गडगडले आहेत. दरम्यान, एका दिवसात बाजाराच्या अशा पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत कोट्यवधी 45 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.


3 जून रोजी सुस्साट, 4 जून रोजी गटांगळ्या


देशात पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार निकाल लागतील या अपेक्षेने 3 जून रोजी शेअर बाजार चांगलाच उसळला होता. याच संधीचा फायदा घेत 3 जून रोजी गुंतवणूकदारांनी कोट्यवधीचे रुपये कमवले. आज 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणी चालू आहे. पण मतमोजणीदरम्यान अनेकांना थक्क करून सोडणारे निकाल लागत आहेत. भाजपला अनेक ठिकाणी धक्के बसत असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात भाजपला जबर फटका बसत आहे. याच कारणामुळे शेअर बाजारात मोठी अस्थितरता निर्माण झाली आहे. आजच्या दिवशी आतापर्यंत शेअर बाजारात लोकांनी तब्बल 45 लाख कोटी रुपये गमवले आहेत. 


सोमवारी काय स्थिती होती? 


सोमवारी निफ्टी आणि सेन्सेक्स या निर्देशांकांनी चांगली उडी घेतली होती. दिवसाअखेर सेन्सेक्स 2500 तर  निफ्टी 733 अकांची उसळी घेत अनुक्रमे 76,468.78 आणि 23,263.90 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजारात सोमवारी ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या. त्याच पद्धतीने मंगळवारीदेखील निर्देशांकांचा आलेख चढा राहील असा अंदाज बांधला जात होता. पण आज प्रत्यक्ष चित्र उलटे दिसले. बाजार खुलताच दोन्ही निर्देशांकांत घसरण चालू झाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. BSE MCap नुसार गुंतवणूकदारांचे तब्बल 45 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.


हेही वाचा :


Lok Sabha Election Result Share Market Live Update : शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स थेट 4500 अंकांनी कोसळला


लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आणि शेअर बाजाराचा संबंध काय? जाणून घ्या 20 वर्षांचा इतिहास


Lok Sabha Election Result Share Market : लोकसभेचे कल...शेअर बाजार कोसळलं, कारण नेमंक काय?