एक्स्प्लोर

पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला : राज ठाकरे

मुंबईत एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातील पूरस्थितीवर राज्य सरकारवर निशाणा साधला. निवडणूक पुढे ढकलून पुढच्या वर्षी घ्या, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

मुंबई : कोल्हापूर, सांगलीमधील पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मुंबईत एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातील पूरस्थितीवर राज्य सरकारवर निशाणा साधला. निवडणूक पुढे ढकलून पुढच्या वर्षी घ्या, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. तसंच या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. "भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे. चार दिवसांनी सरकारला जाग आली आहे. यात्रा आणि पक्षप्रवेशामधून त्यांना वेळ नाही.  भाजपला जनतेशी काही देणं घेणं नाही. भाजप काय, शिवसेना काय, दोन्ही पक्ष राजकारण करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा," असं राज ठाकरे म्हणाले. जागांचा अंदाज येतो, मग पावसाचा येत नाही? "चंद्रकांत पाटील काल म्हणाले की, पाऊस किती पडेल आणि पाणी भरेल याचा अंदाज नव्हता. अशा परिस्थितीत तुम्हाला 220-225 आकड्यांचा अंदाज येतो, आमदार निवडून येण्याचा अंदाज येतो. मग एवढा पाऊस पडतो, पाणी भरतंय याचा अंदाज येत नाही," असा उपहासात्मक प्रश्नही राज यांनी विचारला. सरकारला यात्रा, राजकारणातून वेळ मिळत नाही "पूरपरिस्थिती पहिल्यांदा भारतीय लष्कराने हाताळायला हवी होती. परंतु यांच्या यात्रा सुरु होत्या, राजकारणातून वेळ मिळत नव्हता. चार दिवसांनंतर तिथे जाता. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसतील, फक्त राजकारण करत बसायचं, मग यात्रा, पक्षप्रवेश करायचे, यातच त्याचा वेळ जात आहे. त्यामुळे कोण जगलं काय, कोण मेलं काय त्यांना काहीच फरक पडत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले. निवडणुका पुढे ढकला राज ठाकरे म्हणाले की, "दोन दिवसांनी पाणी ओसरेल, रोगराई पसरेल. परिस्थिती स्थिरस्थावर व्हायला अजून वेळ लागेल. दोन-चार दिवसात होणार नाही. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लावणार, मग मदतीसाठी सरकार हात वर करणार. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे असं मला वाटतं. त्या पुढील वर्षी घ्या. संपूर्ण लक्ष कोल्हापूर, सांगलीसह आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा. आपल्याकडे एका पुतळ्यावर तीन हजार कोटी खर्च होतात, लोकांना वाचवण्यासाठी मदत होत नाही, तर काय उपयोग? आज राज्यात एवढा विरोधाभास आहे की, अनेक ठिकाणी पाऊस नाही आणि दुसरीकडे पाऊस आहे तर पूर आला आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घ्यायच्या हे योग्य नाही, माणुसकीला धरुन नाही. त्यामुळे सरकारने निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत आवश्यत आहे. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करावा." राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget