एक्स्प्लोर

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, संतप्त मनसेकडून ठाणे बंदचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांची ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. येत्या 22 ऑगस्टरला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 22 ऑगस्टला गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिला आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. मात्र या नोटीसनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांना 22 तारखेला चौकशीसाठी बोलावलं तर ठाणे बंद करु, असं मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसंच प्रेमाने बंद केलं तर स्वागत नाहीतर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात त्यादिवशी जे घडेल, त्याला सरकार आणि जबाबदार असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रमक राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवल्याचं विशेष वाटत नाही : संजय राऊत काय आहे प्रकरण? काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 

व्हिडीओ

Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Ahilyanagar Crime News: कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
Gold Silver Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
Vidyanand Bapat on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
Mumbai Crime News: विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
Ketan Agrawal Pune Lohagad Case : 'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई
मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Embed widget