एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेसाठी शिवसेनेकडून आडकाठी करण्याचे प्रयत्न?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत सभा घेण्यास शिवसेनेकडून आठकाठी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 24 तारखेला राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत सभा घेण्यास शिवसेनेकडून आठकाठी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 24 तारखेला राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. मात्र अजूनही या सभेला परवानगी मिळालेली नाही. निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली 'एक खिडकी यंत्रणा' आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. '18 तारखेला राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीसाठी प्रयत्न केला असता मनसेचा कोणताही उमेदवार निवडणुकीला उभा नसल्याने त्यांनी महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी असं निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं सांगून परत पाठवलं', अशी माहिती मनसे नेते संजय नाईक यांनी दिली आहे. मुंबईतील शिवडी परिसरात राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेनेकडून 18 तारखेला अर्ज करुन शिवडी परिसरातील चार मैदानं आरक्षित करण्यात आली, असा आरोपही मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच परवानही मिळाली नाही तरी सुद्धा मनसेची सभा होणारच अशी भूमिका मनसेकडून घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आतापर्यंत नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेतल्या आहेत. राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. त्यापुर्वी आणखी तीन ते चार सभा राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Thane Crime Pradeep Purnekar death case: मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?
मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?
Embed widget