एक्स्प्लोर

भामरेंना पाडण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठीच लोकसभा निवडणूक लढवणार : आमदार अनिल गोटे

आमदार अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा निवडणूक जरूर लढवावी, त्यांनी आपली डिपॉझिट देखील वाचवून दाखवावी असं आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावर अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांचं हे विधान म्हणजे सत्तेची गुर्मी असल्याची प्रतिक्रिया दिली.

धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना पाडण्यासाठी आपण स्वतः लोकसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र लोकसभा मतदारसंघात आढावा घेतला असता आपल्याविषयी मतदारांमध्ये असलेला विश्वास पाहता ही निवडणूक आपणच जिंकणार असल्याचं आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. VIDEO | धुळ्यात भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव करणे हे एकमेव लक्ष्य : अनिल गोटे | एबीपी माझा धुळे लोकसभा निवडणुकीत डॉ .सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं अनिल गोटे यांनी जाहीर करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. आमदार अनिल गोटे हे धुळे शहरातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. एकाच पक्षाचे असलेले अनिल गोटे आणि सुभाष भामरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. आमदार अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा निवडणूक जरूर लढवावी, त्यांनी आपली डिपॉझिट देखील वाचवून दाखवावी असं आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावर अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांचं हे विधान म्हणजे सत्तेची गुर्मी असल्याची प्रतिक्रिया दिली. अनिल गोटे यांनी घेतली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने नाराज असलेले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत भाजवविरोधात लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. तसेच धुळ्यात भाजप उमेदवाराचा पराभव करणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं त्यांनी याआधीही म्हटलं होतं. VIDEO | राजकीय हालचालींना वेग, अनेक विरोधक शरद पवारांच्या भेटीला | मुंबई | एबीपी माझा शरद पवारांना माझी भूमिका सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मला कशी मदत करायची हा त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच शरद पवारांना पुन्हा भेटणार असल्याचंही गोटे यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणावरुन वाद झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल गोटे यांचा 'तेलगीचा मित्र' म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने अनिल गोटे वैर विसरुन शरद पवारांच्या भेटीला गेले होते. भाजप-अनिल गोटे वाद? आमदार अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने त्यांनी नव्या 'लोकसंग्राम' पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी 'लोकसंग्राम' या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष 57 असे 59 उमेदवार उभे केले. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आलं. त्यांच्या मुलगा तेजस गोटे यांचाही पराभव झाला. मतदारांनी गोटे यांना नाकारलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget