एक्स्प्लोर

मी अद्यापही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार : अर्जुन खोतकर

उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजुनही सुटलेला नसल्याचं चित्र आहे. आजपर्यंतचे सर्व सर्व्हे हे माझ्या बाजुनं आहेत. मी लढण्यास इच्छूक असून उद्धव ठाकरे माझ्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, अशी आशा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्युजमध्ये बोलताना व्यक्ती केली.

अर्जुन खोतकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांमधील राजकीय वैर भाजप-शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत रावसाहेब दानवेंचं नाव आहे. मात्र मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं खोतकरांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचं खोतकरांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन केलं होतं. दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी अद्याप जालन्यातून नेमकं कोण लढणार हा प्रश्न सुटला नसल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Embed widget