एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडून संधीचं राजकारण, राज किमान संधीसाधू नाहीत, मिलिंद देवरांचं मत

शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा मोदींची लाट होती, तेव्हा सेनेने स्वतःचा फायदा करुन घेतला. जेव्हा मोदी विरोधात जनमत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका केली, अशा शब्दात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले.

मुंबई : उद्धव ठाकरेंनी संधीचं राजकारण केलं आहे, किमान मनसे अध्यक्ष राज ठाकरे संधीसाधू नाहीत, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केलं आहे. मात्र महाआघाडीत मनसे समाविष्ट होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. युती झाली असली तरी शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? असा प्रश्न मिलिंद देवरा यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना उपस्थित केला. शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा मोदींची लाट होती, तेव्हा सेनेने स्वतःचा फायदा करुन घेतला. जेव्हा मोदी विरोधात जनमत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका केली, अशा शब्दात देवरांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले. 'मूळात मराठी माणसाला माहित आहे, शिवसेनेनं काय केलं! तीन पेंग्विन आणि शिव वडा व्यतिरिक्त सेनेने काहीच केलं नाही. मिल कामगारांसाठी कोणी मिल खरेदी केल्या?' असा प्रश्न उपस्थित करतानाच मुंबईतील भाडेकरुंसाठी काँग्रेसने काम केल्याचा दावाही मिलिंद देवरांनी केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काम केलं नाही. त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते, जनता नाराज आहे, असा विश्वास देवरांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असे संकेत मिलिंद देवरांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन दिले होते. मात्र आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचंही मिलिंद देवरांनी सांगितलं. उद्धव ठाकरे संधीसाधू आहेत, पण राज ठाकरे किमान संधीसाधू नाहीत. मात्र राज ठाकरे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे, असंही देवरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाआघाडीत मनसेला घेण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल असली, तरी काँग्रेस त्यांना जवळ ओढणार का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रिया दत्त, संजय निरुपम आणि मुंबई काँग्रेस हा पक्षांतर्गत प्रश्न असल्यामुळे याबाबत बोलणार नसल्याचं देवरांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरांनी ट्विटरवरुन मुंबई काँग्रेसमधील दुफळीवर बोट ठेवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Embed widget