Lok Sabha Election Result 2024 : यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर धक्कादायक निकाल आले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) मुसंडी मारली तर महायुतीचा अनेक महत्त्वाच्या जागांवर पराभव झाला. महाराष्ट्रातील मराठवाड्यात तर अनेक जागांवर अनपेक्षित निकाल आले. ज्या जागांवर भाजपाचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व होते, त्या जागांवर मराठवाड्यातील मतदारांनी भाजपला नाकारले. यात बीड आणि छत्रपती संभाजीनगरात महायुतीचा उमेदवार निवडून आला आहे. बाकीच्या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीच बाजी मारली आहे. 


मराठवाड्याचा निकाल काय? (Marathwada Election 2024 Result) 


छत्रपती संभाजीनगर- (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result)


छत्रपती संभाजीनगरची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. या जागेवर तिहेरी लढत झाली होती. पण या लढाईत महायुतीचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संदिपान भुमरे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांना एक लाख मतांच्या फरकाने पराभूत केले आहे. दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या स्थानी राहिले आहेत. 


बीड- (Beed Lok Sabha Election Result)


बीड जिल्ह्यातील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या जागेवरून पराभूत झाल्या आहेत.


जालना- (Jalna Lok Sabha Election Result)


जालना या मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना तिकीट दिले होते. मात्र या जागेवर त्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवरून काँग्रसचे नेते कल्याणराव काळे हे विजयी झाले आहेत. काळे यांनी दानवे यांचा 90 हजारपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे.


परभणी - (Parbhani Lok Sabha Election Result)


परभणी या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीकडून उभे होते. त्यांच्या विजयासाठी नरेंद्र मोदी यांनीदेखील परभणीत सभा घेतल्या होत्या. पण त्यांचा येथून धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय जाधव हे विजयी झाले आहेत. जाधव यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे. 


नांदेड- (Nanded Lok Sabha Election Result)


भाजपचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेड ही जागा प्रतिष्ठेची होती. भाजपने या जागेवरून प्रतापराव चिखलीकर यांना तिकीट दिले होते. मात्र या जागेवर काँग्रेसचे नेते वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत. चव्हाण यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. 


उस्मानाबाद (धाराशीव)- (Osmanabad Lok Sabha Election Result)


धाराशीव या जागेवर भाजपने अर्चना पाटील यांना तिकीट दिले होते. तर उद्धव ठाकरे यांच्याशिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर हे मैदानात होते. या जागेवर ओमराजे यांनी तब्बल 3 लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपसाठी हा पराभव धक्कादायक असल्याचे म्हटले जातेय. 


लातूर- (Latur Lok Sabha Election Result)


लातूर या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) आणि भाजपचे दुसऱ्या वेळेस संधी मिळालेले खासदार सुधाकर शृंगारे (Sudhakar Shrangare) यांच्यात प्रमुख लढत झाली. या जागेवर शिवाजीराव काळगे यांनी विजयी पताका फडकवली आहे. त्यांनी श्रृगांरे यांचा 50 हजारपेक्षा अधिक मताधिक्यांनी पराभ केला आहे. 


हिंगोली- (Hingoli Lok Sabha Election Result)


मराठवाड्यातील हिंगोली या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या जागेसाठी महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर हे मैदानात होते. तर महायुतीकडून नागेश आष्टीकर हे निवडणूक लढवत होते. त्यांनी ठाकरे गाटाच्या शिवसेनेने तिकीट दिले होते. दरम्यान, या जागेवर ठाकरे यांच्या आष्टाकीर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी कोहळीकर यांचा एक लाख मताधिक्याने पराभव केलाय.


हेही वाचा :


वायनाडमध्ये विजय, रायबरेलीतही डंका! दोन्ही जागांवर राहुल गांधींचा लाखो मतांच्या फरकाने विजय!


Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : उत्तर पश्चिमची फेर मतमोजणी, अमोल कीर्तिकर विजयी मात्र वायकर यांच्या मागणीनुसार, रिकाउंटिंग सध्या सुरू