Rahul Gandhi Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election Result 2024) निकाल स्पष्ट झाला आहे. भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश यासारख्या महत्त्वाच्या राज्यांत अनपेक्षित धक्का बसला आहे.भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) यावेळी दमदार कामगिरी केली करत अनेक जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल यांनीही यावेळी नेत्रदीपक कामगिरी केली असून वायनाड (wayanad) आणि रायबरेली (Raebareli) या दोन्ही जागांवर तीन लाखांपेक्षा अधिक मतांच्या फरकांनी विजय मिळवला.


वायनाडमध्ये राहुल गांधींना किती मतं? 


राहुल गांधी यांनी 2019 साली केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांचा मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. यावेळीदेखील राहुल गांधी यांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. राहुल गांधी यांना या जागेवर आतापर्यंत 6 लाख 47 हजार 445 मतं पडली आहेत. या जागेवर कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवार अॅनी राजा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना आतापर्यंत 2 लाख 83 हजार 23 मतं मिळाली आहेत. भारतीय जनता पार्टीचे के सुरेंद्रन हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना 1 लाख 41 हजार 45 हजार मतं मिळाली आहेत. म्हणजेच राहुल गांधी आणि द्वितीय क्रमांकाचा नेता यामध्ये एकूण 3 लाख 64 हजार 422 मतांचा फरक आहे. मतांचा हा फरक भरून निघणारा नाही. त्यामुळे आता राहुल गांधी येथून विजयी झाल्याचे गृहित धरले जात आहे. 


रायबरेलीमध्ये नेमकी काय स्थिती? 


रायबरेली मतदारसंघातूनदेखील राहुल गांधी हेच आघाडीवर आहेत. सध्या त्यांना 6 लाख 84 हजार 598 मते पडली आहेत. या जागेवर भारतीय जनता पार्टीचे दिनेश सिंह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना आतापर्यंत अवघी 2 लाख 95 हजार 856 मते पडली आहेत. म्हणजेच राहुल गांधी हे सध्या 3 लाख 88 हजार 742 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या उमेदवराला मतांचा हा फरक भरून काढणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच राहुल गांधी या जागेवरून विजयी झाले, असे गृहित धरले जात आहे.  


हेही वाचा :


Varanasi Lok Sabha Election 2024 : वारणसीत नरेंद्र मोदी हेच बॉस! काँग्रेसचा उमेदवार दीड लाख मतांनी पिछाडीवर!


लोकसभेच्या निकालामुळे शेअर बाजाराची विध्वंसक आपटी, दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल 45 लाख कोटी स्वाहा!


Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : वर्ध्यात अमर काळे ठरले जाएंट किलर; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का