एक्स्प्लोर

एक आणि पाच सप्टेंबरला भाजपमध्ये मेगाभरती, अमित शाहांच्या उपस्थितीत 'या' दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा

भाजपमध्ये पुढच्या मेगाभरतीचा मुहूर्त ठरला आहे. एक आणि पाच सप्टेंबरला होणार पुढची मेगाभरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

मुंबई : भाजपमध्ये पुढच्या मेगाभरतीचा मुहूर्त ठरला आहे. एक आणि पाच सप्टेंबरला होणार पुढची मेगाभरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. एक सप्टेंबरला सोलापुरात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तर पाच सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत हे प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांचे निकटवर्तीय उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांचा देखील भाजप प्रवेश होईल, अशा चर्चा आहेत. दोघेही जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर होते. एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहेत, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत. शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण इच्छुक असल्याचं कळतं आहे. विशेष म्हणजे भाजपने प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत. चंद्रकांत पाटलांकडून 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत भाजप-शिवसेनेमधील चर्चेत 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात दिले होते. "युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल," असं पाटील म्हणाले होते. जागावाटपाच्या निर्णयावरुन उद्धव ठाकरेंचा पाटलांवर निशाणा चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेच्या जागांविषयी बोलताना ते म्हणाले की, "युतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला मी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मिळवून ठरवू." परंतु आता भाजपने सर्वच 288 मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्याने, निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget