Manoj Jarange Patil and Santosh Bangar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलही मैदानात उतरले आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मराठा-मुस्लिम-दलित, अशी युती करण्याचा प्रयत्न जरांगेंनी केलाय. यासाठी दलित नेते आनंदराज आंबेडकर आणि मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगेंना साथ दिली आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे यांनी कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार आणि कोणत्या मतदारसंघात पाडण्याची भूमिका घेणार हे सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी कमळनुरी मतदारसंघात पाडण्याची भूमिका घेणार असल्याची सांगितले. त्यानंतर शिंदेंचे विद्यमान आमदार आणि उमेदवार संतोष बांगर यांनी धसका घेतला आहे. 


100 गाड्या घेऊन बांगर समर्थक अंतरवालीकडे निघणार


मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी मध्ये पाडणार असल्याची भूमिका घेतली जाणार आहे. हे समजताच आमदार संतोष बांगर यांचे समर्थक मनोज जरांगे यांना साद घालण्यासाठी आंतरवाली सराटीच्या दिशेने निघत आहेत. जवळपास  100 गाड्या  घेऊन बांगर यांचे समर्थक निघणार आहेत.  जरांगे यांना भेटून कळमनुरीमध्ये पाडण्याचा घेतलेला निर्णय बदलावा, अशी साद घातली जाणार आहे.


मनोज जरांगे कुठे पाडणार आणि कुठे लढणार? 


उभे करणार असणारे मतदारसंघ


1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)


2) परतूर, (जालना जिल्हा)


3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)


4) बीड, (बीड जिल्हा)


5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)


6) पाथरी,( परभणी जिल्हा)


7) हदगाव, (जिल्हा नांदेड)


पाडणार असणारे मतदारसंघ 


1) भोकरदन, (जालना जिल्हा)


2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)


3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)


4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)


5) जिंतूर, (परभणी जिल्हा)


6) औसा-(लातूर जिल्हा)


पाठिंबा देणार असणारे मतदारसंघ 


1) बदनापूर राखीव जालना जिल्हा


2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर


मनोज जरांगे काय काय म्हणाले? 


आज राज्यातील उमेदवार आलेले आहेत. आज आम्ही निर्णय घेणार आहोत. कोणते उमेदवार आणि कोणते मतदारसंघ देणार हा निर्णय घेणार आहोत. जुनी म्हण आहे थोडच करायचं पण नीट करायचं. आमच्या समोर मोठा राक्षस आहे, त्याची वाट लावावी लागणार आहे. आम्हाला जिथे समाजाच्या हिताचे आहे तिथेच लढणार आहोत. जो आपल्याला लेखी देईल आणि व्हिडिओ ग्राफी करून देईल ,त्याला न लढणाऱ्या जागेवर मदत करायची आहे. बॉण्ड आणि व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार नाहीत, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, 'या' महत्त्वाच्या मतदरसंघात उमेदवार देणार; अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढणार!


Manoj Jarange Patil : संतोष बांगर, औसामधील अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवेंचा मुलगा मनोज जरांगेंच्या हिटलिस्टवर! कोणाला पाडणार? यादी समोर