Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर कोणाला झटका देणार? याची चर्चा रंगली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, कोणत्या उमेदवारांना पाडणार यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये डोकेदुखी वाढली आहे. 


मनोज जरांगे कुठे पाडणार अन् कुठे लढणार? 


उभे करणार


1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी,( परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड)


पाडणार


1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा-(लातूर जिल्हा)


पाठिंबा देणार


1) बदनापूर राखीव जालना जिल्हा
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर


संतोष बांगर, अभिमन्यू पवार, दानवेंचा मुलगा मनोज जरांगेंच्या हिटलिस्टवर!


दरम्यान, कळमनुरीमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, औसामधून भाजप आमदार अभिमन्यू पवार, भोकरदनमधून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे आदी दिग्गज चेहरे मनोज जरांगे पाटील यांच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे बदनापूरमधून पाठिंबा देण्याची घोषणा सुद्धा पाटील यांनी केली आहे.  


दरम्यान, मनोज जरांगे यांनी काही संभाव्य मतदारसंघाची बैठकीत नाव घेतली. संभाजी नगरमधील फुलंब्री मतदारसंघातून उमेदवार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर, बीड जिल्ह्यातील 2 मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत. त्यामध्ये बीड तालुका आणि केज (राखीव, मतदारसंघ) मधून जरांगे पाटील यांचे उमेदवार देण्यात येतील, असे दिसते. जिल्ह्यात काही पाडायचे आहेत. जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा आहे. बीड विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून बघू. तर, केज (राखीव) बाबत स्थानिक मराठा जे निर्णय घेतली तो निर्णय घेऊ, असेही पाटील यांनी सांगितले.  दरम्यान, राखीव मतदारसंघाबाबत 10 तारखेनंतर निर्णय घेऊ, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले . 


इतर महत्वाच्या बातम्या