एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रोड शो दरम्यान कानशिलात लगावली, युवकाला आप कार्यकर्त्यांनी धुतले
अरविंद केजरीवालांना कानाखाली लगावल्यानंतर आप कार्यकर्त्यांनी त्या युवकाला बेदम मारहाण केली. या युवकाला दिल्ली पोलिसांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारादरम्यान एका युवकाने कानाखाली लगावल्याचा प्रकार घडला आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मोतीनगरमध्ये आपचे उमेदवार बृजेश गोयल यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी रोड शो दरम्यान एका युवकाने केजरीवाल यांच्या गाडीच्या बोनेटवर चढून त्यांच्या कानाखाली लगावली.
अरविंद केजरीवालांना कानाखाली लगावल्यानंतर आप कार्यकर्त्यांनी त्या युवकाला बेदम मारहाण केली. या युवकाला दिल्ली पोलिसांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
या घटनेनंतर आपचे नेते संजय सिंह यांनी दिल्ली पोलीस आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय सिंह यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा मोदी सरकारच्या अधीन आहे. अरविंद केजरीवाल यांचे जीवन सर्वात असुरक्षित आहे. त्यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. हिम्मत असेल तर समोर येऊन वार करा, दुसऱ्यांना पुढे करून असे हल्ले का करता? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, केजरीवाल यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. मोदी सरकार अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठ्या हल्ल्याची वाट बघतंय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. मोदी आणि अमित शाह हे केजरीवाल यांची हत्या करवू पाहताहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. 5 वर्ष सगळी ताकत लावून त्यांचे मनोबल तोडू शकले नाहीत, निवडणुकांमध्ये हरवू शकले नाहीत. त्यांना अशा पद्धतीने हटवू पाहत आहात काय? असे म्हणत केजरीवाल तुमचा काळ आहे, असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.माननीय मुख्यमंत्री @ArvindKejriwal की सुरक्षा में चूक जानभुजकर की जा रही है क्योंकि दिल्ली पुलिस मोदी सरकार के अधीन आती है। सांसद @SanjayAzadSln pic.twitter.com/rv1Jf2ccLX
— Ajit Tyagi (@_AjitTyagi) May 4, 2019
माहितीनुसार सदर मारहाण करणारा युवक या परिसरातील राहणारा नाही. तो बाहेरून आला आहे. केजरीवाल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांना एका रिक्षा चालकाने कानाखाली मारली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केजरीवाल यांच्यावर अज्ञात व्यक्तीने मिरची पावडर फेकली होती.क्या मोदी और अमित शाह अब केजरीवाल की हत्या करवाना चाहते हैं? 5 साल सारी ताक़त लगाकर जिसका मनोबल नहीं तोड़ सके, चुनाव में नहीं हरा सके..अब उसे रास्ते से इस तरह हटाना चाहते हो कायरो!
ये केजरीवाल ही तुम्हारा काल है. — Manish Sisodia (@msisodia) May 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement