Jagdish Mulik: पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक देखील इच्छुक होते, जगदीश मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी याआधी सांगितलं होतं, मात्र, सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर जगदीश मुळीक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भेटीमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती जगदीश मुळीक यांनी दिली.


आज देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेतली. वडगाव शेरीत भाजपचा पाया भक्कम आहे. स्वच्छ चारित्र्य घेऊन भाजप लढण्यास इच्छूक आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यासंदर्भात आम्ही बांधील आहोत. आमच्यावर संघाचे संस्कार आहेत, आपल्याला नाराजीचे चित्र दिसणार नाही. सातत्याने आम्ही श्रेष्ठींच्या संपर्कात असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत, अजून ३-४ दिवस आहेत, भाजपला हा मतदारसंघ मिळावा असं कार्यकर्त्यांकडून निरोप आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध नाही, मात्र कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतंय, आमचा पाया मतदारसंघात भक्कम आहे, असंही मुळीक यांनी म्हटलं आहे. 


जगदीश मुळीक नाराज असल्याच्या चर्चा


पुण्याच्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झाले होते, त्यानंतर त्यांना विधानसभेत संधी दिली जाईल अशा चर्चा होत्या, त्या अनुषंगाने त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, काल वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरेंना उमेदवारी मिळाली, त्यामुळे आता जगदीश मुळीक यांची नाराजी दूर होऊन ते आता प्रचारात सक्रिय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंं आहे.


कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त


सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त राहिली होती. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. सुनील टिंगरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं होतं की, मला अजित पवारांनी तयारी करायला सांगितली आहे. वडगाव शेरीच्या जागेवर माझा दावा आहे. रात्री मला अजित पवारांचा फोन आला होता. दुसरी यादी येईल. या यादीत माझं नाव असेल, असा विश्वास टिंगरे यांनी व्यक्त केला होता. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI