Sharad Pawar NCP Candidate List 2024: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच पक्षांनी उमेदवार यादांचा सपाटा लावला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पुण्यातील चार मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये खडकवासला, पर्वती, पिंपरी आणि जुन्नर मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. अद्याप चिंचवड मतदारसंघाचा उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही.
शरद पवारांनी जुन्नरमध्ये काँग्रेसचा युवा चेहरा निवडला
जुन्नर विधानसभेत काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर महायुतीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना संधी देण्यात आली आहे. सत्यशील शेरकर यांचा अतुल बेनके यांच्या विरोधात सामना होणार आहे.
खडकवासल्यातून सचिन दोडकेंना संधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना पुन्हा खडकवासला मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सचिन दोडके यांना शनिवारी एबी फॉर्मही देण्यात आला आहे. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्याविरोधात गेल्यावेळी सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला होता, यावेळी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र या मतदारसंघात इच्छुक असलेले नेते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
पर्वती मतदारसंघातून पुन्हा एकदा अश्विनी कदम यांना संधी देण्यात आली आहे, या मतदारसंघातून 2009 मध्ये लढलेले सचिन तावरे देखील इच्छुक होते. काँग्रेसकडून माजी महापौर आबा बागूल व अभय छाजेड यांचे नाव चर्चेत आले होते.
खडकवासला - सचिन दोडके
पर्वती - अश्विनी कदम
जुन्नर - सत्यशील शेरकर
पिंपरी - सुलक्षणा शीलवंत
आज 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा
एरंडोल – सतीश अण्णा पाटील
गंगापूर – सतीश चव्हाण
शहापूर – पांडुरंग बरोरा
भूम-परांडा – राहुल मोटे
बीड – संदीप क्षीरसागर
आर्वी – मयुरा काळे
बागलान – दीपिका चव्हाण
येवला – माणिकराव शिंदे
सिन्नर – उदय सांगळे
दिंडोरी – सुनीताताई चारोसकर
नाशिक पूर्व – गणेश गिते
उल्हासनगर – ओमी कलानी
जुन्नर – सत्यशील शेरकर
पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
खडकवासला – सचिन दोडके
पर्वती – अश्विनीताई कदम
अकोले – अमित भांगरे
अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
माळशिरस – उत्तम जानकर
फलटण – दीपक चव्हाण
चंदगड – नंदिनीताई कुपेकर
इचलकरंजी – मदन कारंडे