Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवलाय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून केवळ 49 जागांवर विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे महायुतीने 230 पेक्षा जास्त जागा खेचून आणल्या आहेत.
महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेले जिल्हे
1. धुळे - 5 पैकी 5 जागा महायुतीने जिंकल्या
2. जळगाव - 11 पैकी 11 - जागा महायुतीने जिंकल्या
3. वर्धा - 4 पैकी 4 जागा महायुतीने जिंकल्या
4. गोंदिया 4 पैकी 4 जागा महायुतीने जिंकल्या
5. नांदेड 9 पैकी 9 जागा महायुतीने जिंकल्या
6. हिंगोली 3 पैकी 3 जागा महायुतीने जिंकल्या
7. जालना 5 पैकी 5 जागा महायुतीने जिंकल्या
8. छत्रपती संभाजीनगर 9 पैकी 9 जागा महायुतीने जिंकल्या
9. सातारा - 8 पैकी 8 जागा महायुतीने जिंकल्या
10. सिंधुदुर्ग 3 पैकी 3 जागा महायुतीने जिंकल्या
11. कोल्हापूर 10 पैकी 10 जागा महायुतीने जिंकल्या
महायुतीतील कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?
भाजपने 132 जागांवर विजय मिळवला
शिवसेनने (शिंदे गट)- 57 जागांवर विजय मिळवला
राष्ट्रवादीने (अजित पवार गट)- 41 जागांवर विजय मिळवला
महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाने किती जागांवर विजय मिळवला?
काँग्रेसने 103 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी केवळ 16 जागांवर विजय मिळवलाय.
राष्ट्रवादीने (शरद पवार गट) 87 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 10 जागांवर विजय मिळवता आलाय. मात्र, पिपाणीने शरद पवारांना 10 जागांवर फटका बसलाय.
शिवसेनेने (ठाकरे गट)- 95 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 20 जागांवर विजय मिळवता आलाय. उद्धव ठाकरेंनी बालेकिल्ला असलेले अनेक जिल्हे गमावले आहेत.
20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, कोण कोणते जिल्हे?
धुळे, जालना, छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक, जळगाव
कोण कोणते नेते पराभूत ?
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
धीरज विलासराव देशमुख
ऋतुराज पाटील
यशोमती ठाकूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या