Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 Lucky Zodiacs : नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 25 नोव्हेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात गजकेसरी राजयोगासह (Gajkesari Rajyog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांचं घरातील वातावरण आठवड्याच्या सुरुवातीला चांगलं असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कुटुंबातील काही मोठी जबाबदारी घ्याल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पालकांसह सर्व सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या सर्वांचं सहकार्य आणि साथ मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. नोकरदार लोकांसाठी आठवडा खूप फायदेशीर सिद्ध होईल. विवाहितांसाठी देखील हा आठवडा खूप फायदेशीर आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला तुम्हाला दिला जातो. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर राहील. कारण, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळण्यास सुरुवात होईल. तसेच, या आठवड्यात तुम्ही लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता. हा प्रवास तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल. पण थोडा थकवा जाणवेल. या आठवड्यात व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी जोखीम पत्करावी लागेल, असं केल्याने तुम्ही मोठं यश देखील मिळवता येईल. या संपूर्ण आठवड्यात कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. ज्यांना प्रेमविवाह करण्याची इच्छा आहे, त्यांच्या प्रेमविवाहाला या आठवड्यात मान्यता मिळू शकते. ज्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न राहील.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक पावलावर भाग्याची साथ मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कारकिर्दीत इतकं साध्य कराल की तुमच्या विरोधकांनाही आश्चर्य वाटेल. या आठवड्यात परीक्षा स्पर्धेची तयारी करणारे लोक खूप मेहनत करताना दिसतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमचं मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक असेल. या आठवड्यात व्यवसायातील अडचणी दूर होतील. तथापि, या आठवड्यात तुमचा खर्च खूप जास्त असणार आहे. जोडीदाराविषयी परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरेल. जे लोक दीर्घकाळापासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा खूप अनुकूल असेल. कारण, या आठवड्यात तुमच्या व्यवसायाला तुमच्या इच्छेनुसार मार्ग दिसेल. या आठवडय़ात तुम्हाला न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळाल्याने तुमची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्व कामं या आठवड्यात पूर्ण होतील. तुमच्या किरकोळ समस्या सोडल्या तर एकंदरीत तुमचं आरोग्य सामान्य राहील. या आठवड्यात तुम्ही जे काही पैसे कमवाल, ते चांगल्या प्रकारे गुंतवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही बराच काळ चिंतेत होता, त्या सर्व गोष्टी या आठवड्यापासून सकारात्मक घडतील. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंबाबत थोडं सावध राहावं लागेल. तुम्ही या काळात तुमच्या विरोधकांपासून थोडं सावध राहावं. कारण, तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. या आठवड्यात तुमचे मित्र तुम्हाला उपयोगी पडतील, ते तुमच्या सुख-दु:खात तुमची साथ देतील आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुमचा प्रियदार किंवा जोडीदार अडचणींना तोंड देण्यासाठी तुमची ताकद बनेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :