Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होण्यास काही तास उरले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यात बुधवारी (दि.19) होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीये. राज्यभरात 2 लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
राज्यभरात 9 कोटी, 70 लाख 25 हजार 119 मतदार
36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4,136 उमेदवार.....यामध्ये पुरुष मतदार 5 कोटी 22हजार 739,तर महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतक्या आहेत, आणि 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
राज्यात 4.69 कोटी महिला मतदार
राज्यात एकूण महिला मतदार 4,69,96,279 आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे
मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट
1,00,427 इतक्या मतदान केंद्रांसाठी साधारणपणे 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध
आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात 532 एफआयआर दाखल
महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्या मनुष्यबळाचा समावेश आहे. विविध तक्रारींच्या अनुषंगाने 532 एफ आय आर दाखल झाले आहेत. यापैकी 210 प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून 63प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित 259 प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.
'एफ आय आर' बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
1) मुंबई शहर व मुंबई उपनगर : 36
2) ठाणे : 38
3) पालघर : 05
4) नाशिक : 49
5) धुळे : 01
6) बीड : 18
7) अहिल्यानगर : 32
8) पुणे : 48
9) छत्रपती संभाजीनगर : 25
10 जालना : 10
11 जळगाव : 10
12 नंदुरबार : 03
13 कोल्हापूर : 26
14 रत्नागिरी : 10
15 सिंधुदुर्ग : 00
16 सातारा : 15
17 सांगली : 08
18 सोलापूर : 28
19 लातूर : 12
20 धाराशिव : 06
21 रायगड : 19
22 परभणी : 07
23 नांदेड : 15
24 हिंगोली : 12
25 यवतमाळ : 07
26 वाशिम: 03
27 वर्धा : 06
28 अमरावती : 17
29 अकोला : 02
30 बुलढाणा : 08
31 चंद्रपूर : 03
32 गडचिरोली : 06
33 भंडारा : 15
34 गोंदिया : 03
35 नागपूर : 29