एक्स्प्लोर

भाजपची तिसरी यादी जाहीर, मात्र खडसे, तावडे, बावनकुळे, मेहता अजूनही वेटिंगवरच

भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, नितेश राणे, बाळासाहेब सानप या महत्त्वाच्या नेत्यांची नावं नाहीत.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, नितेश राणे, बाळासाहेब सानप या महत्त्वाच्या नेत्यांची नावं नाहीत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये काशीराम पावरा (शिरपूर मतदारसंघ), डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी (रामटेक मतदारसंघ), परीणय फुके (साकोळी मतदारसंघ), रमेशसिंह ठाकूर (मालाड पश्चिम मतदारसंघ) यांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश होता. तर तिसऱ्या यादीत चार उमेदवार घोषित केले आहेत. तिन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत 143 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पक्ष राज्यात 146 जागा लढवणार आहे. त्यामुळे आता केवळ 3 जागा जाहीर करणं बाकी आहे. त्यामुळे चौथ्या यादीत खडसे, तावडे, बावनकुळे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, नितेश राणे, बाळासाहेब सानप यांच्यापैकी कोणाचं नाव असणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. (एकनाथ खडसे यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली जाणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत.)

महत्त्वाच्या बातम्या

पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Embed widget