एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha election 2024: AB फॉर्म म्हणजे काय रे भाऊ? निवडणुकीत उमेदवारीसाठी कसला फॉर्म भरतायत उमेदवार?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विधानसभा किंवा लोकसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज करायचा असेल तर...

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राज्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्यात बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जनतेसमोर ठेवल्या आहेत. सध्या एखाद्या उमेदवाराने AB फॉर्म भरला असे तुमच्या अनेकवेळा कानावर आले असेल. येणाऱ्या वृत्तांमध्येही AB फॉर्म भरल्याची वृत्त येत आहेत. पण हा AB फॉर्म आहे तरी काय? जाणून घेऊया..

A, B  फॉर्म म्हणजे काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विधानसभा किंवा लोकसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज करायचा असेल तर त्याची खासगी माहिती आणि तो कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यासाठी त्याला दोन स्वतंत्र फॉर्म भरावे लागतात. यातील पहिला फॉर्म हा A आणि दुसऱ्या फॉर्मला B असे संबोधले जाते. याला एकत्रित AB फॉर्म संबोधले जाते. AB फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराला त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजले जाते. त्यामुळं हा फॉर्म भरणं महत्वाचं समजलं जातं.

पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळण्यासाठीचा अधिकृत अर्ज

एबी फॉर्म भरला म्हणजे तो उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे   शिक्कामोर्तब होते.  पक्षाचे अधिकृत चिन्ह उमेदवारीमागे लागण्यासाठी उमेदवार AB फॉर्म भरतात. या फॉर्मवर पक्षाने तिकिट वाटपासाठी अधिकृत नेमणूक केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते. हा फॉर्म भरणे म्हणजे त्या राजकीय पक्षाने फॉर्म भरणाऱ्या उमेदवारास त्यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवण्याचे तिकिट दिले आहे असा होतो. या फॉर्ममध्ये काही प्रतिज्ञापत्रकंही असतात. 

फॉर्म ए मध्ये काय असते? 

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्षतर्फे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे नाव सांगणारा हा फॉर्म आहे. या फॉर्मवर पक्षाचा अधिकृत शिक्का आणि तिकिटवाटपासाठी पक्षाने नेमलेल्या प्रमुख व्यक्तीची सही असते. यात पक्षातील अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचे नाव, पक्षातील पद, पक्षाचे चिन्ह या गोष्टी नमूद असतात. 

बी फॉर्मवर काय असते?

फॉर्म बी मध्ये राजकीय पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवाराचे नाव व इतर माहिती असते. बी फॉर्मवर पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचेही नाव असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर 'बॅकअप' म्हणून या दुसऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोग अधिकृत उमेदवार म्हणून निवडू शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget