Hasan Mushrif Meets Manoj jarange Patil : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणचे राजकीय नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) येत आहेत. अशातच कोल्हापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. परवाच मुश्रीफ यांचे विरोधक आणि शरद पवार गटाचे उमेदवार समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अशातच आज मुश्रीफ अंतरवाली सराटीत आले आहेत. 


मनोज जरांगे रात्रीपर्यंत निर्णय सांगणार


मनोज जरांगे पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांमध्ये अंतरवाली सराटीत चर्चा झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्याकडे समर्थन माघितलं आहे. याबाबत मनोज जरांगे रात्रीपर्यंत सांगणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी भेटीनंतर दिली आहे.


कागलमध्ये काँटे की टक्कर


कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध समरजीत घाटगे यांच्यात काँटे की टक्कर आहे. निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही उमेदवारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र, कागलमध्ये मराठा समाज नेमका कोणच्या मागे उभा राहणार हा येणारा काळच ठरवणार आहे. मात्र, कागलमध्ये ही अटितटीची लढत मानली जात आहे. 



मननोज जरांगे पाटील आज उमेदवार आणि मतदारसंघाची घोषणा करणार


मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात ज्यांनी आमच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्या. सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा. चांगली संधी आलेली आहे. ओढातानीच्या नादात ही संधी घालू नका. मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. मराठा, दलित, मुस्लिम हे समीकरण एकत्र आलं आहे. आम्हाला तीन तारखेला मतदार संघ आणि उमेदवार जाहीर करायचे आहे. त्यामुळे आज किंवा उद्या एकत्र बसून एकच उमेदवार जाहीर करा, असं मनोज जरांगे यांनी आज म्हटलं होतं. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आज त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.



महत्वाच्या बातम्या:


Samarjit Ghatge: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं