Shani Dev : नोव्हेंबरचा महिना सुरु झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीनंतर (Diwali 2024) कर्मफळदाता शनी मार्गी होणार आहे. त्यामुळेच धार्मिक दृष्टीकोनातून आणि ज्योतिष शास्त्रानुसार हा महिना फार खास असणार आहे. कारण या दरम्यान एक, दोन नाही तर तीन मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी 30 जून 2024 रोजी वक्री झाले होते. त्यानंतर तब्बल 139 दिवसांनी वक्री झाल्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी मार्गी होऊन सरळ चाल चालणार आहे. तर, 9 ऑक्टोबर 2024 रोजी देवगुरु बृहस्पती वक्री झाले होते. त्यानंतर 119 दिवस उलटी चाल केल्यानंतर 4 फेब्रुवारी 2025 ला मार्गी होणार आहे. शनी आणि गुरु ग्रहाव्यतिरिक्त बुध ग्रह 26 नोव्हेंबर 2024 रोजी वक्री होणार आहे. बुध ग्रह 20 दिवस वक्री अवस्थेत राहिल्यानंतर 16 डिसेंबरला मार्गि होणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा महिना कोणत्या राशींची चिंता वाढवणार ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
नोव्हेंबर महिन्यात शनी, बुध आणि गुरु ग्रह वक्री अवस्थेत राहिल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात कमतरता दिसेल. तसेच,तुच्या करिअरमध्ये तु्म्हाला अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. नोकरदार वर्गांचा कामाच्या ठिकाणी मन रमणार नाही. तसेच, तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल.
सिंह रास (Leo Horoscope)
नोव्हेंबर महिन्यात शनी, बुध आणि गुरूच्या वक्रीचा नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळणार नाही. तसेच, तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. नोकरदार वर्गाचं कामात लक्ष नसल्या कारणाने वेळेत टार्गेट पूर्ण होणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनी, बृहस्पती आणि बुध ग्रह वक्री अवस्थेत असल्या कारणाने हा काळ अशुभ असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण असेल. छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन वाद होतील. त्यामुळे तुमच्या तब्येतीवर देखील याचा परिणाम होणार आहे. तसेच, या काळात तुमचं आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही निराश असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :