NCC Share Price : शेअर बाजारात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. या ठिकाणी एका क्षणात एखादा गुंतवणूकदार कोट्यधीश बनतो तर कधी-कधी एखादी व्यक्ती आपले कोट्यवधी रुपये गमावून बसते. योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास मात्र तुम्हाला शेअर मार्केट चांगली कमाई करून देऊ शकते. दरम्यान, शेअर बाजारात तुम्हाला श्रीमंत करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. फक्त या कंपन्यांचा शोध तुम्हाला घेता आला पाहिजे. बांधकाम क्षेत्रात काम करणारी एनसीसी ही अशीच एक कंपनी आहे. या कंपनीला (NCC Ltd) नुकतेच मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे ही कंपनी भविष्यात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देईल, असा दावा केला जात आहे.
3,496 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स मिळाल्या
एक्स्चेंज फायलिंगनुसार एनसीसी लिमिटेड या कंपनीला ऑक्टोबर महिन्यात एकूण 3,496 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या ऑर्डर्स राज्य, केंद्र सरकार तसेच खासगी कंपन्यांकडून मिळाल्या आहेत. 1 नोव्हेंबर रोजी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 4.66 टक्क्यांनी वाढून 312.50 रुपयांवर पोहोचला आहे.
NCC Order Details: ऑक्टोबर महिन्यात मिळाल्या 3496 कोटींच्या ऑर्डर्स
NCC ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात या कंपनीला एकूण 3,496 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यातील 2,684 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स बिल्डिंग डिव्हिजन, 538 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स इलेक्ट्रिकल सेगमेंट आणि 274 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स वॉटर आणि अन्य कामांसाठी मिळालेल्या आहेत. या सर्व ऑर्डर्स राज्य सरकार, केंद्र सरकारकडून मिळालेल्या आहेत. यातील काही ऑर्डर अन्य कंपन्यांकडूनही मिळालेल्या आहेत.
NCC Share Performance: 3 वर्षांत तब्बल 323 टक्क्यांनी रिटर्न्स
एनसीसी या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केलेली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. गेल्या एका आठवड्यापासून हा स्टॉक साधारण 12 टक्क्यांनी वाढला आहे. सहा महिन्यांत या स्टॉकने 29 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या वर्षात आतापर्यंत या स्टॉकमध्ये 88 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर पूर्ण एका वर्षांत हा शेअर 121 टक्क्यांनी वाढलेला आहे. गेल्या तीन वर्षांत या कंपनीने तब्बल 323 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचे 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 364.50 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील नीचांकी मूल्य 143.40 रुपये आहे. बीएसईवर या कंपनीचे बाजार मूल्य 19,620.21 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
'ही' महारत्न कंपनी झाली 50 वर्षांची, एका वर्षात गुंतवणूकदारांना दिले 50 टक्के रिटर्न्स!
स्विगी ते निवा बुपा! या आठवड्यात खुले होणार एकूण 5 आयपीओ, पैसे ठेवा तयार
क्रेडिट कार्ड वापरताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा खिसा होईल खाली!