पुणे: राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघातील निकाल काल (शनिवारी) समोर आले आहेत. राज्यभरात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर महायुतीला जागा मिळवण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात 21 पैकी 18(Pune Assembly Elections 2024) विधानसभेवर विजय मिळवला आहे. तर शहरातील आठपैकी सात जागांवर महायुतीने आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. शहरातील 21 पैकी 18 (Pune Assembly Elections 2024) सर्व महत्त्वाचे मतदारसंघ पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. वडगाव शेरीची आणि खेडची  जागा जिंकत महाविकास आघाडीनं आपलं अस्तित्व टिकवलं आहे. मात्र, जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. (Pune Assembly Elections 2024)


पुणे जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?


भाजप - 9
शिवसेना (शिंदे)- 1
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - 8
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार - 1
शिवसेना ठाकरे - 1
अपक्ष - 1


पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचे चित्र


कसबा
हेमंत रासने भाजप- विजयी 
रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत 
गणेश भोकरे, मनसे - पराभूत


कोथरूड
चंद्रकांत पाटील विजयी 
चंद्रकांत मोकाटे, शिवसेना युबीटी - पराभुत 
किशोर शिंदे, मनसे - पराभूत 


पर्वती 
माधुरी मिसाळ,भाजप - विजयी 
अश्विनी कदम, राष्ट्रवादी SP - पराभूत 


पुणे कॅन्टोन्मेंट 
सुनील कांबळे, भाजप - विजयी 
रमेश बागवे, काँगेस - पराभूत 


वडगाव शेरी 
सुनील टिंगरे -राष्ट्रवादी AP पराभुत 
बापू पठारे- राष्ट्रवादी SP विजयी 


खडकवासला 
भीमराव तापकीर, भाजप - विजयी 
सचिन दोडके, राष्ट्रवादी SP - पराभूत
मयुरेश वांजळे , मनसे- पराभूत 


शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी 
दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत


हडपसर
चेतन तुपे - राष्ट्रवादी AP विजयी 
प्रशांत जगताप - राष्ट्रवादी SP पराभूत 
साईनाथ बाबर, मनसे - पराभूत


बारामती
अजित पवार राष्ट्रवादी AP -विजयी 
युगेंद्र पवार राष्ट्रवादी SP - पराभूत 


इंदापूर 
दत्ता भरणे, राष्ट्रवादी AP विजयी 
हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी SP पराभूत 


आंबेगाव
दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी AP विजयी 
देवदत्त निकम -राष्ट्रवादी SP पराभूत 


जुन्नर
शरद सोनवणे अपक्ष -विजयी 
अतुल बेनके अजित पवार गट - पराभूत 
सत्यशील शेरकर शरद पवार गट - पराभूत


शिरुर
माउली कटके, राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयी 
अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत 


पुरंदर
विजय शिवतारे, शिवसेना -विजयी 
संजय जगताप, काँग्रेस - पराभूत


भोर
शंकर मांडेकर, अजित पवार गट - विजयी. 
संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.


मावळ
सुनील शेळके अजित पवार गट - -विजयी 
बापू भेगडे अपक्ष - पराभूत.


पिंपरी
अण्णा बनसोडे, अजित पवार गट - विजयी 
सुलक्षणा शिलवंत, शरद पवार गट - पराभूत 


चिंचवड 
शंकर जगताप, भाजप - विजयी 
राहुल कलाटे, शरद पवार पक्ष - पराभूत


भोसरी
महेश लांडगे, भाजप - विजयी 
अजित गव्हाणे, शरद पवार गट  - पराभूत 


खेड 
बाबाजी काळे, शिवसेना UBT - विजयी.
दिलीप मोहिते पाटील अजित पवार गट - पराभूत.