Wardha District Vidhan Sabha Election 2024 वर्धा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. काही वेळातच सुरुवातीचे कल हाती येतील. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच, राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

क्र मतदारसंघ महाविकासआघाडी महायुती विजयी उमेदवार मिळालेली मतं 
आर्वी  मयूरा काळे (राष्ट्रवादी – एसपी) सुमित वानखेडे (भाजप)    
देवळी  रणजीत कांबळे (काँग्रेस) राजेश बकाने (भाजप)    
वर्धा  शेखर शेंडे (काँग्रेस) डॉ. पंकज भोयर (भाजप)    
हिंघणघाट  अतुल वांदिले (राष्ट्रवादी – एसपी) समीर कुणावार (भाजप)      

 

वर्ध्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली होती. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस गेल्या लोकसभेला तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली.

परिणामी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळवली आणि विजयही! ऐकूनात विदर्भासह वर्ध्यातही महायुतीला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी विधनसभा निवडणुकीला नेमकं कुणाची हवा असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरी त्याआधी वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघात सध्या आमदार कोण? हे जाणून घ्या सविस्तर.

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व?

विधानसभा निवडणुक उंबरठ्यावर असताना महाविकास आघाडीत आणि महायुतीमध्ये उमेदवारी कुणाला? या प्रश्नावर सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते आहे. महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याने यावेळी वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच यावेळी आघाडीकडे मित्र पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग आहे. तर महायुती मध्ये देखील उमेदवारी साठी इच्छुक दबक्या आवाजात इच्छा व्यक्त करीत होते. मात्र भाजपने आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार जाहीर करत  तीन पैकी दोन विद्यमान आमदारांना भाजपने जैसे थे ठेवत पुन्हा संधी दिली आहे.  

वर्ध्याच्या चार पैकी तीन जागांवर भाजपचे उमेदवार

महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली केलीय. या यादीमध्ये वर्ध्यातील देवळी, वर्धा आणि हिंगणघाट या तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. देवळी येथून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यात विद्यमान आमदार पंकज भोयर आणि हिंगणघाट येथे विद्यमान आमदार समीर कुणावार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या वर्ध्यातील तीन जागावर उमेदवारी जाहीर झाल्यावर आता आर्वी येथे नेमका कोणता चेहरा महायुतीकडून  जाहीर केला जातो हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वर्धा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून कुणाची वर्णी?

वर्धा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत काँग्रेसचे शेखर शेंडे, अभ्युदय मेघे आणि डॉ.सचिन पावडे ही नावे चर्चेत आहे. तिन्ही इच्छुक उमेदवारांनी तयारी देखील सुरू केली आहे. शेखर शेंडे हे तीनवेळा वर्धा विधानसभेत निवडणूक लढले. यात त्यांना अंतर्गत विरोधाने पराभव पत्करावा लागला. यावेळी शेंडे यांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी अलीकडे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी देखील उमेदवारीसाठी दावा केला आहे. गेल्या एक वर्षांपासून अभ्युदय मेघे हे मतदार संघात विविध कामातून सक्रिय आहे. आरोग्य क्षेत्रात नाव असलेले डॉ. सचिन पावडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारी जर मिळाली नाही तर आघाडीत बंडखोरी देखील होण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रवक्ते नितेश कराळे आणि शिवसेनेच्या उबाठा गटाकडून नेहाल पांडे हे देखील लढण्यास इच्छुक आहे. महायुतीमध्ये आमदार पंकज भोयर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून वर्ध्यात आणखी कुणी उमेदवार समोर येऊ शकतो काय? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीकडून माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी जाहीररीत्या उमेदवारी मिळाल्यास आपण लढणार असल्याचे संकेत दिले होते. तर खासदार विजय मुंडे यांच्या कन्या अर्चना मुंडे (वानखेडे )यांच्या नावाची देखील चर्चा होती. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून माजी जी.प.सदस्य राणा रणनवरे यांनी देखील तयारी चालविली आहे. त्यामुळे  वर्धा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा