अहमदनगर सुजय विखेंच्या (Sujay Vikhe)  सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा खळबळ उडाली आहे.  जयश्री थोरातांवर खालच्या पातळीवर टीकेनंतर गाड्याची जाळपोळ करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनवर काँग्रेस कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत.  दरम्यान वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखेंनीही निषेध केलाय. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलीय. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील वक्तव्याचा निषेध केला आहे.  आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची, अशी टीका सत्यजीत  तांबे (Satyajeet Tambe) यांनी केली आहे. 


सत्यजीत तांबे म्हणाले,  सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे. या वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता.  आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची.  बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.


काँग्रेस निषेध मोर्चा काढणार


 जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकरणी  विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहे. वसंतराव देशमुखांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक आहे.  काँग्रेसच्यावतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस निषेध मोर्चा काढणार आहे.


 जयश्री थोरातांवर खालच्या पातळीवर टीकेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक


एकीकडे लाडकी बहीण योजना आणायची त्याचा प्रचार करायचा आणि दुसरीकडे महिलांविषयी असे अपशब्द वापरायचे अशी टीका करत दुर्गाताई तांबे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यात एका महिलेबाबत झालेल्या वक्तव्यानंतर संगमनेर तालुका नवे तर जिल्ह्यातून आता याचा निषेध व्यक्त होतो. 


हे ही वाचा :


Sujay Vikhe vs Balasaheb Thorat: जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान; पोलीस स्थानकासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन, संगमनेरमध्ये वाद चिघळला