Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळीची सांगता होण्यास आता अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक राहिला आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर आता संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दुपारी 5 वाजतापर्यंत नागपूर विदर्भासह संपूर्ण राज्यात किती टक्के मतदान झाले ज्याची आकडेवारी समोर आली आहे. यात राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी (approximate)
सायंकाळी 5 वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी ५६.०६ %
हिंगणा ५५.७९ %
कामठी ५३.४५ %
काटोल ५९.४३ %
नागपूर मध्य ५०.६७ %
नागपूर पूर्व ५५.९८ %
नागपूर उत्तर ५१.७० %
नागपूर दक्षिण ५३.३६ %
नागपुर दक्षिण पश्चिम ५१.५४ %
नागपूर पश्चिम ५१.८९ %
रामटेक ६५. ५९ %
सावनेर ६४.२३ %
उमरेड ६७.३७ %
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड - ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली - ६१.१८ टक्के,
जळगाव - ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड - ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे - ५४.०९ टक्के,
रायगड - ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के,
वर्धा - ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
मुंबईशहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सायंकाळी ०५. ०० वाजेपर्यंतची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-
मतदारसंघ मतदान (अंदाजे)
१७८-धारावी - ४६.१५ टक्के
१७९सायन-कोळीवाडा- ५०.५४ टक्के
१८०- वडाळा – ५२.६२ टक्के
१८१- माहिम – ५५.२३ टक्के
१८२-वरळी – ४७.५० टक्के
१८३-शिवडी – ५१.७० टक्के
१८४-भायखळा – ५०.४१ टक्के
१८५- मलबार हिल – ५०.०८ टक्के
१८६- मुंबादेवी - ४६.१० टक्के
१८७- कुलाबा - ४१.६४ टक्के
हे ही वाचा