वसई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र मतदानाच्या दिवशीच एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. निवडणूक कर्तव्यावर जात असताना आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.    


याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. सुमन संतोष यादव असे मृत महिलेचे नाव असून त्या ३९ वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 5 वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या. 


आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी आज नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 1 येथे होती. आज सकाळी सुमारे 6.30 वाजता, त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्या धावत्या रेल्वेखाली आल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमन यादव यांच्या आकस्मिक निधनाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ


Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल