Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra Vidhan Parishad Election Live : विधानपरिषदेच्या निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2022 02:56 PM
आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवत आहोत -मुनगंटीवार
आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवत आहोत... विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले होते आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयासाठी पाचवा उमेदवार उभा केल्याचे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.. विधानपरिषद निवडणुकीची आम्ही अतिशय नियोजनपूर्वक तयारी केली आहे.. आमदारांच्या सद्सद्विवेकबुद्धी वर आमचा विश्वास असून आम्ही विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला... २४ ऑक्टोबर २०१९ रोजी आमच्याशी धोका झाला होता... मतदारांशी गद्दारी करण्यात आली होती.. त्यामुळे  आता "जैसे करम केले तसाच फळ देईल आमदार अशी वेळ आल्याचे मुनगंटीवार म्हणाले... आश्चर्य म्हणजे ज्यांनी मतदारांशी विश्वासघात केला, गद्दारी केली, आता तेच लोक आमदारांना संदर्भात गद्दारी आणि धोका केल्याची गोष्ट सांगत आहेत.. हे जगातील आठवा अजुबा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही असे म्हणत असले तरी त्यांचं काहीही चुकलेलं नाही... जनतेने त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे... शिवसेनेच्या सर्व आमदारांना आवाहन आहे की त्यांनी १९६६ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषण एकदा ऐकावे.. शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही.. ज्यांना मात्र खुर्चीचा प्रेम आहे, जे बाळासाहेबांचा विचार विसरले आहेत... ते मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करतील असे ही मुनगंटीवार म्हणाले... संजय राऊत आमदारांच्या सद्सदविवेकबुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणत आहेत... या पूर्वीही त्यांनी डॉक्टर पेक्षा कंपाउंडर मोठा, पाप केल्याने कोरोना होतं, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही, असे अनेक वक्तव्य केले आहे... त्यांच्या या सर्व वक्तव्यांबद्दल हजारो वर्षांच्या संशोधनानंतरच उत्तर सापडतील अशी मिश्किल टिप्पणी ही मुनगंटीवार यांनी केली..

 
हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवार पोहोचले, विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार आणि जयंत पाटील आमदारांशी वन टू वन बातचीत करणार

हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवार पोहोचले, विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार आणि जयंत पाटील आमदारांशी वन टू वन बातचीत करणार


आमदारांना मतदान प्रक्रियेबाबत पक्षाचे दोन्हीं वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार

राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने 21 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक

राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने 21 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक


बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी दिल्लीसाठी रवाना होणारं


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वानंतर आता विरोधी पक्षाची दिल्लीत दुसरी बैठक 


21 जूनच्या बैठकीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता


आप आणि बीजु जनता दल बैठकीला उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदारांना पक्षादेश जारी

उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला आहे

काय आहे हा पक्षादेश पाहूया- 


विधानपरिषदेचे निवडणूकीचे मतदान सोमवार, दिनांक २० जून २०२२ रोजी सकाळी होणार आहे...


९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे
घेण्यात येणार आहे.


 सदर निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाचे  सचिन अहिर व श्री. आमश्या पाडवी हे दोन उमेदवार उभे असून शिवसेनेच्या सर्व विधानसभा सदस्यांनी पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार प्राथम्यक्रमाने त्यांना मतदान करावयाचे आहे.


 सदर निवडणूकीसाठी शिवसेना पक्षांच्या उमेदवारांचा प्राथम्यक्रम व निवडणूकीच्या सूचना घेण्यासाठी सोमवार, दिनांक २० जून, २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४ विधानभवन, मुंबई या दालनात सकाळी १०.०० वाजता उपस्थित रहावे.


 आपल्याला देण्यात आलेल्या प्राधान्य क्रम व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान करावे, असा पक्षादेश आहे.

राज्यसभेला मतांचा कोटा जाहिर करून आम्ही मोठी चूक केली आता ती चूक करणार नाही- भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य   

राज्यसभेला मतांचा कोटा जाहिर करून आम्ही मोठी चूक केली आता ती चूक करणार नाही- भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य   


 

एकनाथ खडसे निवडून येतील आणि त्यांना भाजपमधील काही आमदारांची मते मिळतील- अनिल पाटील, मुख्य प्रतोद, राष्ट्रवादी

एकनाथ खडसे निवडून येतील आणि त्यांना भाजपमधील काही आमदारांची मते मिळतील


भाजप मध्ये एकनाथ खडसे यांना मानणारा एक वर्ग आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपचे 50 ते 55 आमदार महाविकास आघाडीकडून लढतील 


- आज दुपारी 2 नंतर अजित पवार आणि जयंत पाटील सर्व आमदारांना वन टू वन भेटून चर्चा करतील आणि त्याना मतदानाबाबत माहिती देतील


महाविकास आघाडीच्या प्रमूख नेत्यांची संध्याकाळी बैठक होईल त्या मध्ये मतांचे पसंती क्रमांक कसे असावेत याबाबात चर्चा होईल. 


संध्याकाळी पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांना मुख्यमंत्री यांच्यात झलेल्या बैठकीबाबत माहिती दिली जाईल आणि पसंती क्रमांक कुणाला द्यायचे याची माहिती दिली जाईल

विधानपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत अपक्ष आणि लहान पक्ष महाविकास आघाडीतील कुणाला मतदान करणार याबाबत  संभ्रम कायम 

विधानपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत अपक्ष आणि लहान पक्ष महाविकास आघाडीतील कुणाला मतदान करणार याबाबत  संभ्रम कायम 


आज संध्याकाळपर्यंत अपक्षांना आणि लहान पक्षांच्या आमदारांना मतदानाबाबत निरोप मिळणार  


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संध्याकाळी बैठक होईल यात अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या मतांची जुळवाजुळव कशी करायची हे ठरेल 


राज्यसभा निवडणूूकीत उशीरा निरोप मिळाल्यानं लहान पक्षांच्या आमदारांनी नेमके कुणाला मतदान करायचे याबाबत बराच गोंधळ झाला होता


यावेळी तसा गोंधळ होऊ नये याची काळजी घेतली जाणार


काल समाजवादी पार्टी   आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली मात्र, त्यानंतर सपानं काँग्रेसला मतदान करायचे की राष्ट्रवादीला यावर अद्याप अंतीम निर्णय झाला नाही 


तसेच, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि काँग्रेस नेत्यांचीही बैठक झाली त्यानंतर आज अपक्षांच्या मताबाबत निर्णय घेतला जाईल

राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडून आमदारांना व्हीप जारी- सूत्र 

राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडून आमदारांना व्हीप जारी- सूत्र 


राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना मतदान करावं यासाठी मुख्य प्रतोद यांच्याकडून आमदारांसाठी व्हीप जारी


महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकी नंतर आमदारांना उमेदवारांचा पसंती क्रमांक कसा असावा याबाबत माहिती देण्यात येणार


उद्या मतदानापूर्वी आमदारांसाठी दुसरा व्हीप जारी करण्यात येणार

पार्श्वभूमी

Maharashtra  Vidhan Parishad Election Live :  राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार आहेत. दगाफटका टाळण्यासाठी मुख्यमंत्री कोटा ठरवणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ही विशेष रणनीती तयार केलीय.



Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. विधानपरिषदेची निवडणूक उद्या पार पडणार आहे. त्यामुळं प्रत्येक पक्ष आपापल्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी रणनीती आखली आहे. 


बैठकीत मतांचा कोटा वाढवून घेण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही
राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या दोन उमेदवारांसाठी खास रणनीती आखली आहे.  राष्ट्रवादीकडे सध्या 51 आमदार आहेत. राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार आणि श्यामसुंदर शिंदे यांच्या मदतीने राष्ट्रवादी दुसरी जागा सहजत्या निवडून आणेल. मात्र गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे मत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मतांचा कोटा वाढवून घेण्याबाबत राष्ट्रवादी मागणी करेल. याचंसाठी शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांवर डोळा असल्याची चर्चा आहे.


आमदार आणि अपक्ष आमदार यांच्याशी वन टू वन बातचीत
राज्यसभेला अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनी मते फोडली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. असा आरोप पुन्हा होण्याची कोणतीही शक्यता नको यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दुपारी 2 नंतर राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदार आणि अपक्ष आमदार यांच्याशी वन टू वन बातचीत करणार आहेत. यामध्ये आमदारांना मतदान कसं करावं आणि कुणाला करावं याबाबात माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित आमदारांची नेमकी अडचण काय आहे? मतदार संघातील प्रलंबित प्रश्न याबाबात चर्चा करणार आहेत. 


राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान कसं करावं याबाबत मार्गदर्शन


शिवसेनेचे सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर आता अशा प्रकारची कोणतीच चूक होऊ नये यासाठी आजचं राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं जाईल. त्याबाबतची रंगीत तालीम देखील पार पडेल.  संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रेप्रन्शियल व्होट बाबत चर्चा होईल आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाचे नेते याबाबात आपल्या आमदारांना माहिती देतील.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.