Maharashtra Vidhan Parishad Election 2022: महाराष्ट्रात सध्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची घाई सुरू आहे. राज्यसभेची उमेदवारी मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. यासंदर्भात सध्या काय घडामोडी सुरू आहेत पाहुयात.

विधानपरिषदेच्या बदल्यात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का?
राज्यसभेच्या सहा आणि विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यसभेसाठी भाजपनं तीन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर, महाविकास आघाडीनं चार उमेदवार दिले आहेत. पण आता राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याची चर्चा सुरू झाली.

राज्यसभेसाठी शिवसेनेनं चौथा उमेदवार मागे घेतला तर भाजप विधान परिषदेसाठी फक्त चारच उमेदवार देईल. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शिवसेनेलाला एक पाऊल मागे जाऊन राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी लागेल. तसं झालं तर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीला 10 पैकी 6 जागा मिळतील आणि भाजपला 4 जागा मिळतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ- 172

पक्ष संख्याबळ
शिवसेना 55
राष्ट्रवादी 53
काँग्रेस 44
बहुजन विकास आघाडी 3
प्रहार जनशक्ती पार्टी 2
समाजवादी पार्टी 2
माकप 1
शेकाप 1
स्वाभिमानी पक्ष 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी 1
अपक्ष  9

विरोधकांचं एकूण संख्याबळ - 112

भाजप 106
जनसुराज्य शक्ती 1
राष्ट्रीय समाज पक्ष 1
अपक्ष 4

भूमिका स्पष्ट न केलेल पक्ष  

पक्ष संख्याबळ
एमआयएम 2
मनसे 1

राज्यसभेची सहावी जागा जिंकणारच असा दावा भाजप आणि शिवसेना या दोघांकडूनही करण्यात येत आहे. असं असलं तरीही या दोघांचीही मदार अपक्षांवर आहे. आणि अपक्षांना व्हिप लागू होत नाही. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी दोन्ही बाजूला सामंजस्याची भूमिका घेत ही निवडणूक बिनविरोध करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे देखील वाचा-