Rajya Sabha Elections 2022 : माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस न्यायायात धाव घेणार आहे, यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी यासाठी कामाला लागली आहे. राष्ट्रवादी यासाठी न्यायालयात जाणार असून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहोत. मागील काळामध्येही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, त्यावेळी त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. रमेश कदम आणि छगन भुजबळ यांनाही अशा प्रकारची परवानगी मिळाली होती. प्रयत्न करणं आमच्या हातामध्ये आहे,तो आम्ही कसोशीने करण्याचा प्रयत्न करू.


केंद्राकडे अजूनही जीएसटीची थकबाकी


उपमुख्यमंत्र्यांनी जीएसटीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मार्च 2022 पर्यंत राज्याकडे येणारे जीएसटी रक्कम 29 हजार 600 कोटी रुपयांपैकी 14 हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. केंद्राकडून अजूनही 15 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे ते म्हणाले. ही रक्कम मिळाल्यास आम्हाला विकास कामासाठी खर्च करता येतील असे त्यांनी नमूद केले. दरम्यान,केंद्र सरकारने एकूण 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला आहे. महाराष्ट्रासह गुजरात,दिल्ली,पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. 21राज्यांचा मिळून एकूण 86 हजार 912 कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. 


ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न


मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यांत देखील ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले...


राज्यसभा निवडणुकीवर अजित पवार म्हणाले


भाजपचे दोन उमेदवार, महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे 5 उमेदवार निवडून येणार आहेत. आता सहाव्या जागेचं चित्र 3 तारखेला स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला अतिरिक्त मतांचा कोटा हा शिवसेनेला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या अटकेत असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या