बीड: महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणून बीड लोकसभा (Beed Lok Sabha Constituency) मतदारसंघाकडे पाहिलं जातंय. बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane ) लोकसभेच्या रिंगणात आहेत. बजरंग सोनवणे यांनी आज स्ट्राँग रूमची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बजरंग सोनवणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यात शाब्दिक वाद पाहायला मिळाला. परंतु, स्ट्राँग रूमची पाहणी केल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे.


निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर बजरंग सोनवणे निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित आहेत.अशातच शेवटचा एक दिवस मतमोजणी प्रक्रियेसाठी राहिला असताना निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांना, कांबळे साहेब हात आकडू नका.. अन्यथा मी स्वतःला संपवून घेईल, असं सोनवणे यांनी वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याने खळबळ उडाली होती. 


यानंतर माध्यमांना सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला, तुम्ही प्रशासन म्हणून मदत करा.. मदत आपण नियमाप्रमाणे केली पाहिजे. तुम्ही ऐकणार नसाल तर आमचा राजकीय अंत करणार आहात,असं जर तुम्हाला करायचं असेल तर असं चालणार नाही,अशी विनंती त्यांना केली असल्याचं सोनवणे यांनी म्हटलं आहे.



पोलीस अधीक्षकांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी


बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केलीय.यादरम्यान पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या गेल्यात.बीड मधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात 4 जून रोजी  मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. याच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला गेलाय. आज पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन पाहणी केली. 


संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून 4 जून रोजी वाहतुकीत देखील बदल केला गेला आहे. जिल्ह्यात मनाई आदेश देखील लागू केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं साडेचारशे उपद्रवींना आयडेंटिफाय केले असून त्यातील सर्वच लोकांना नोटीस देण्यात आल्या आहे. तर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याचा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं.


बजरंग सोनवणे आणि अधिकारी यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ :



बीडचा कौल कुणाला? 


बीड लोकसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे. यावेळी भाजपनं विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. आता बीडच्या जनतेनं खासदार म्हणून कुणाला संधी दिली आहे, याचा कौल 4 जूनला स्पष्ट होईल. 


संबंधित बातम्या : 


 Bajrang Sonawane : मोठी बातमी : बजरंग सोनवणे निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकले, म्हणाले मी स्वत:ला संपवून घेऊ का?


NCP Ajit Pawar : अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली