दिंडोरी : कांद्याच्या प्रश्नामुळे चर्चेत आलेल्या दिंडोरी मतदारसंघ (Dindori Lok Sabha). दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंनी विजयाचा गुलाला उधळलला. त्यांच्यासमोर भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं आव्हान होतं. पण भास्कर भगरेंनी सुरुवातीपासून पकड ठेवत तुतारी फुंकली.
दरम्यान भास्कर भगरे यांना 5,18,748 मते मिळाली तर भारती पवारांना 4,25,635 मते मिळाली. भास्कर भगरे यांनी 93,113 मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नामुळे गाजलेली ही निवडणुकीत भास्कर भरगेंनी विजयाचा गुलाल उधळला.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Dindori Lok Sabha Voting Percentage 2024)
दिंडोरी हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 20 व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. 1 9 फेबुवारी 2008 रोजी भारत सरकारच्या सिलेमीटेशन कमिशनच्या शिफारशींवर आधारित राष्ट्रपतींच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून हा मतदारसंघ तयार करण्यात आला. यंदा या मतदारसंघात एकूण 66.75 टक्के मतदान झालं आहे.
नांदगाव - 58.24 टक्के
कळवण - 70.89 टक्के
चांदवड -66.65 टक्के
येवला - 65.38 टक्के
निफाड - 64.31 टक्के
दिंडोरी - 75.42 टक्के
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
दिंडोरी मतदारसंघातील सगळे आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामधील चार आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील आहेत. तर एक शिंदे गट आणि एक भाजप असे आमदार आहे.
निफाड- दिलीप बनकर ( राष्ट्रवादी अजित पवार गट)
येवला- छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दिंडोरी- नरहरी झिरवळ(राष्ट्रवादी अजित पवार गट)
कळवण- नितीन पवार(राष्ट्रवादी अजितदादा)
नांदगाव- सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट)
चांदवड- डॉ राहुल आहेर - भाजप
2019 सालचा निवडणूक निकाल - (Dindori Lok Sabha Constituency 2019 Result)
डॉ. भारती पवार (भाजप) - 567,470 मते (50% मते)
धनराज हरिभाऊ महाले (राष्ट्रवादी) - 368,691 मते (32% मते)
कांद्याच्या प्रश्नामुळे निवडणूक चर्चेत
दरवर्षी कांद्याच्या मुद्यावरुन देशातील राज्यातील वातावरण चांगलेच तापतं. त्यातच यंदा लोकसभा निवडणुकांवरही त्यचा चांगलाच परिणाम झाल्याचं चित्र होतं. कारण सरकारच्या धोरणाचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. यावेळी देखील सरकारच्या धोरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी घालताना सरकारनं 31 मार्चपर्यंत बंदी उठवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारनं 31 मार्चला बंदी उठवली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांद्याची निर्यात बंदच राहणार असल्याचे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच निफाड ही आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या कांद्याच्या प्रश्नाभोवती दिंडोरी लोकसभेचं वातावरण बरंच रंगलं.
दृष्टिक्षेपात दिंडोरी लोकसभा निवडणूक
दिंडोरी लोकसभा मतदार संघात 2009 मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण (2,81,254मते ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ (2,43,907 मते ) यांचा 37 हजार 347 मताने पराभव केला. तर 2014 मध्ये पुन्हा भाजपकडून उमेदवार करताना करताना हरिश्चंद्र चव्हाण (4,42,784 मते ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.भारती पवार (2,95,165 मतं) यांचा 1 लाख 47 हजार 619 एवढ्या मताधिक्याने पराभव केला होता. तर 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर डॉ.भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा 1 लाख 98 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला.
मतदारसंघातील प्रश्न आणि विकास अपेक्षित
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे, कांद्याला हमी भाव मिळावा, निर्यात सदैव खुली राहावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांची आहे. मतदारसंघातील मनमाड, नांदगाव, लासलगाव या रेल्वे स्थानकातील प्रवासी गाड्यांच्या थांब्याबाबत समस्या कायम आहे. नाशिक शहराच्या तुलनेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या मतदारसंघात नाही मोठे हॉस्पिटल उभारणे देखील गरजेचे आहे..याबरोबरच मतदार संघातील सर्वात मोठे शहर आसलेल्या मनमाडमध्ये असलेले रेल्वे मोठे जाळे, लासलगाव प्रसिद्ध कांदा बाजार पेठ, ओझरचे सैनिकी विमान निर्मितीचा कारखाना अर्थात एचएएल, येवल्याची प्रसिद्ध पैठणी, निफाड व दिंडोरीचे द्राक्ष, तसेच उत्तर महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या आदिमायेचा सप्तशृंग गड हे याच मतदार संघात येतो..मात्र नाशिकच्या तुलनेत हा मतदार संघ मागास राहिला आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी बहुल तालुक्यांना निसर्गाने भरभरून दान दिले मात्र पर्यटन विकास हवा तसा झालेला नाही.