एक्स्प्लोर

"बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवा, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा"; शिवसेनेची मागणी, भाजप म्हणाला, "बिहार वेगळा, महाराष्ट्र वेगळा"

महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर, भाजपनं मात्र, बिहार वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा, असं प्रत्युत्तर शिवसेनेला दिलं आहे.

Maharashtra Politics : राज्यात महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं खरं, पण आता मुख्यमंत्री कोण? इथे महायुतीचं घोडं अडल्याचं पाहायला मिळत आहे. आधी शपथविधी 25 तारखेला होणार होता, पण आता सत्ता स्थापनेचा दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनाच (Eknath Shinde) मुख्यमंत्री करा, असा सूर शिवसेनेतून (Shiv Sena) आळवला जात आहे, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी ठराव समंत केल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता शिवसेनेकडून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न (Bihar Pattern) राबवा आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. 

"महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा"

महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे, असं म्हटलं आहे. जसं बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, अगदी तसंच हरियाणात सैनीसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली आणि तेच मुख्यमंत्री झालेत. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करत नाही, असं मला वाटतं, सर्व योजना आणि शासन आपल्या दारी राबवण्यात शिंदेंची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून शिंदेच मुख्यमंत्री होतील, असं मला वाटतं, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं जावं, शिवसेना नेत्यांची बॅटिंग 

शिवसेनेमधून मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा सूर आळवला जात आहे. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रि‍पदी कायम राहावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे.  त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, यासाठी जोरदार बॅटिंग सुरू आहे. नरेश म्हस्के,संजय शिरसाट,भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, यासाठी महायुतीच्या मित्रपक्षांना साद घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिहार वेगळा, महाराष्ट्र वेगळा : रावसाहेब दानवे 

भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, "भाजप आज नाही, अनेक दिवसांपासून मित्र पक्ष असल्यापासून निवडणुका लढवत आहे. ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्यासोबत बसून निर्णय करावे लागतात. एकत्रित निवडणूक लढलो. विधीमंडळ पक्षाची नेते निवड होईल, भाजप देखील लवकर निवड करेल आणि त्यानंतर मित्र पक्षांसोबत बैठक होईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची निवड होईल. फडणवीस मुख्यमंत्री होणं हे कार्यकर्त्यांना वाटू शकतं, मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, ज्यांच्या सोबत लढलो त्यांना विचारुन सोबत घेऊन निर्णय होईल, बिहार वेगळं आहे आणि महाराष्ट्र वेगळा आहे,  तिथे ठरवलेलं होतं की, कितीही आमदार आलेत तरी नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. मात्र महाराष्ट्र आम्ही कोणताही चेहरा ठेवलेला नाही, मी अमित भाईंच्या बैठकीत उपस्थित होतो. निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल असं ठरलं होतं, कौल 2019 साली भाजप शिवसेनेला दिला, मात्र उद्धव ठाकरेंनी पर्याय खुले आहे असं बोलले, बाळासाहेबांना शिव्याशाप देणाऱ्यांसोबत जाऊन बसलेत, आम्ही सरकार चालवलं अनेक चांगले निर्णय झालेत, शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय झालेत, लाडकी बहिण योजना आणली, त्यांच्या जाहीरनाम्यात देखील तेच आलं, मी भाजपच्या प्रचाराचा प्रमुख होतो. आम्ही नागपूर संभाजीनगरला बैठक घेतली." 

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget