Maharashtra NCP Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट, नवं वादळ धडकले. रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबतीला घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीवर दावा केला. शरद पवार यांच्याकडूनही त्या नेत्यांवर कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी शिवसेनेमध्ये रंगलेले नाट्य पुन्हा सुरु झाले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे राज्यासमोर अनेक न्यायालयीन आणि संविधानिक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नाची उत्तरे जाणून राज्य विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ अनंत कळसे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला... यामध्ये प्रतोद कोणता ? मंत्री किती राहणार? अजित पवारांची गटनेता निवड योग्य का ? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
जितेंद्र आव्हाड की अनिल पाटील ?
शिवसेनेच्या फुटी नंतरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्याचे सर्व अधिकार पक्षाच्या अध्यक्षांचे असतात. त्यामुळे शरद पवार जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करत असतील.. तर ते कायदेशीरच ठरेल.. आता अजित पवारांनी अनिल पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून फेर निवड केली आहे.. त्यामुळे अनिल पाटील की जितेंद्र आव्हाड या प्रश्नावर आता विधिमंडळाचे अध्यक्षांसमोरच निर्णय होऊ शकेल.
मंत्री आणि राज्यमंत्री किती ?
घटनेच्या कलम 164 प्रमाणे विधानसभेच्या संख्येच्या 15 टक्के मंत्री राहू शकतात... 91 घटना दुरुस्तीमध्ये महाराष्ट्र बद्दल तरतूद आहे की 43 मंत्री होऊ शकतात... सध्या 29 मंत्री असल्याने 14 जागा रिक्त आहेत. 43 मंत्रीपैकी कॅबिनेट किती आणि राज्यमंत्री किती अशी स्पष्टता नाही.. घटनेत फक्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मंत्री अशीच तरतूद आहे.. 43 मध्ये किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री असा वर्गीकरण नाही.. त्यामुळे कॅबिनेट मंत्री किती ठेवावे हा मुख्यमंत्री आणि राज्यपालांचा अधिकार आहे, असे अनंत कळसे यांनी सांगितले.
अजित पवारांची गटनेता निवड योग्य -
एक संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल पाटील होते आणि कालची (रविवार) बैठक त्यांनीच बोलवली होती.. त्या बैठकीमध्ये अजित पवार यांची निवड गटनेता म्हणून झाली आहे.. त्यामुळे कालपर्यंतचा जो घटनाक्रम आहे तो वैध आहे, कायदेशीर आहे, घटनात्मक आहे.. त्याला चॅलेंज करता येणार नाही.. काल संध्याकाळी जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून शरद पवार यांनी निवड केली आहे.. मात्र कालच्या बैठकीत अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड कायदेशीर ठरेल.. कालची बैठक ही कायदेशीर ठरेल.
काँग्रेसकडे विरोधीपक्ष नेतेपद जाईल -
विरोधी पक्षनेता निवडीचा आपल्याकडे कायदा आहे.. त्यामध्ये विरोधी पक्ष नेता कोण असावा याची स्पष्ट व्याख्या आहे.. त्यामध्ये सरकार विरोधात असलेल्या सर्वात मोठा पक्ष अशी विरोधी पक्ष नेत्याची व्याख्या आहे.. सध्या काँग्रेसची सदस्य संख्या सर्वात जास्त दिसत आहे त्यामुळे हे पद नॅचरली काँग्रेसकडे जाईल..
आमदार अपात्र आहेत की नाहीत ? अध्यक्ष ठरवणार -
राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरण गेलेले आहे.. आधीच शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरणही त्यांच्यासमोर प्रलंबित आहे.. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलेले आहे की तो सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे आणि त्या संदर्भात कुठलीही टाईम लाईन सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही.. तसेच ते त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही असेही सांगितलेले आहे, असे कळसे म्हणाले.
आणखी वाचा :
Maharashtra NCP Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपात कुणाला संधी, कुणाची मंदी?