Maharashtra Lok Sabha Election Result 2024 मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Lok Sabha Result 2024) निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई आणि वायव्य मुंबईत महायुतीचा विजय झाला आहे. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल विरुद्ध भूषण पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, वायव्य मुंबईत रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा यांच्यात लढत झाली.
मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
-उत्तर मुंबईत पियूष गोयल यांचा विजय
-दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंचा विजय
-दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांचा विजय
-वायव्य मुंबईत रवींद्र वायकर यांचा विजय
-उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय
-ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांचा विजय
वायव्य मुंबईत रंगतदार चुरस-
48 मतांनी वायकर विजयी
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती:
26 फेऱ्या आणि टपाली मात्र पत्रिका निर्णय:
Invalid Postal Votes चे verification आपण केलं आहे
अमोल गाजनान किर्तीकर: 4 लाख 52 हजार 596
रवींद्र वायकर: 4 लाख 52 हजार 644
सायंकाळी 4 वाजताच्या मतमोजणीच्या आकडेवारीनूसार
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ
सतरावी फेरी
संजय दिना पाटील - ३ लाख ८९ हजार ०६५
मिहीर कोटेचा - ३ लाख ६१ हजार ८२०
संजय दिना पाटील २७ हजार २४५ मतांनी आघाडीवर
दक्षिण मध्य मुंबईची मत मोजणी प्रक्रिया पूर्ण
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अनिल यशवंत देसाई उमेदवार हे ५३ हजार ३८४ मतांनी निवडणून आले आहेत
अनिल देसाई यांच्या समोर शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे उमेदवार होते
ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई हे ५३३८४ मतांनी विजयी झाले
उज्वल निकम पुन्हा आघाडीवर-
१७६ मतांनी उज्वल निकम आघाडीवर
दुपारी 3.45 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनूसार-
अमोल किर्तीकर यांचा जवळपास २००० मतांनी विजय
मात्र रवींद्र वायकर यांच्या कडून पुनर्मतमोजणी करण्याची मागणी
मुंबई उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड यांनी घेतली आघाडी
उत्तर मध्य मुंबई-
७९३ मतांनी वर्षा गायकवाड आघाडीवर
वर्षा गायकवाड त्यांना 394745 तर उज्वल निकम यांना 393952 मत
दुपारी 3.30 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनूसार-
मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यात देखील काटे की टक्कर
अमोल कीर्तीकर यांचे मताधिक्य केवळ १३३३ मतांचं
अमोल किर्तीकर यांना 375946 मतं, तर रविंद्र वायकर यांना 374613 मतं
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ
संजय दिना पाटील - ३ लाख ४८ हजार २९६
मिहीर कोटेचा - ३ लाख २३ हजार १५४
संजय दिना पाटील २५ हजार ७२ मतांनी आघाडीवर
दुपारी 3.15 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनूसार-
मुंबई उत्तर मध्य मुंबईत उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात काटे की टक्कर
उज्वल निकम यांच्या मताधिक्यात सातत्याने घट
उज्वल निकम यांचा मताधिक्य केवळ ६२३६
उज्वल निकम यांना ३८४२२४ मत तर वर्षा गायकवाड यांना ३७७९८८ मत
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ
पंधरावी फेरी
संजय दिना पाटील - ३ लाख ४८ हजार २९६
मिहीर कोटेचा - ३ लाख २३ हजार १५४
संजय दिना पाटील २५ हजार ७२ मतांनी आघाडीवर
दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईचा निकाल जाहीर-
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. अनिल देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे. तर उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पियुष गोयल यांनी विजय मिळवला आहे. पियुष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण गायकवाड यांचा पराभव केला आहे.
दुपारी 2.45 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार-
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ
संजय दिना पाटील - ३ लाख ०२ हजार ७०३
मिहीर कोटेचा - २ लाख ८२ हजार ८३३
संजय दिना पाटील २० हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर
उत्तर मध्य मुंबई-
उज्ज्वल निकम मताधिक्यात झपाट्याने घट
53हजाराची लीड, 27हजारावर आलं
उज्ज्वल निकम 27086 मतांनी आघाडीवर
उज्ज्वल निकम यांना 363710
वर्षा गायकवाड 336624
दुपारी 2 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार-
मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना पिछाडीवर टाकलं आहे. दक्षिण मुंबईत ठाकरेंचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर सध्या आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदेंचे उमेदवार यामिनी जाधव, राहुल शेवाळे आणि रवींद्र वायकर सध्या पिछाडीवर आहे. त्यामुळे सध्यातरी मुंबईत ठाकरेंचाच आवाज असल्याचं दिसून येत आहे.
दुपारी 1.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार-
अमोल कीर्तिकर यांकडे ३ हजार ९६४ मतांची आघाडी
अमोल कीर्तिकर - २,४४,५९४
रवींद्र वायकर - २ ४०,६३०
दुपारी 1 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार-
दक्षिण मध्य मुंबई
17 व्या फेरीत
अनिल देसाई 361582
राहुल शेवाळे 312330
49252 मतांनी अनिल देसाई आघाडीवर
उत्तर पश्चिममध्ये चुरस कायम
अमोल कीर्तिकर यांनी पुन्हा घेतली 472मतांनी आघाडी
अमोल कीर्तिकर 217092
रवींद्र वायकर 216620
दुपारी 12.30 वाजताच्या मतमोजणीनूसार-
मुंबई उत्तर पूर्व -
संजय पाटील - २२६८५४
मिहीर कोटेचा - २०६३७२
संजय पाटील २० हजार ४८२ मतांनी आघाडीवर
रवींद्र वायकर यांची आघाडी कायम
उत्तर पश्चिम मुंबई
3499 मतांनी रवींद्र वायकर यांची आघाडी
रवींद्र वायकर 179710
अमोल कीर्तिकर 176211
मुंबई उत्तर
पीयूष गोयल -2,20,115
भूषण पाटील - 1,06,367
पीयूष गोयल 1,13,748 मतांनी आघाडीवर
दुपारी 12 वाजताच्या मतमोजणीनूसार-
मुंबई उत्तर
पीयूष गोयल - 186226
भूषण पाटील - 91794
पीयूष गोयल 94432 मतांनी आघाडीवर
उत्तर पश्चिम मुंबई
अमोल कीर्तिकर - 140878
रवींद्र वायकर - 139791
अमोल कीर्तीकर 1087 मतांनी आघाडीवर
उत्तर मध्य मुंबई
उज्जव निकम 48035 मतांनी आघाडीवर
उज्ज्वल निकम - 181132
वर्षा गायकवाड- 133097
सकाळी 11.30 वाजताच्या कलानूसार-
अमोल कीर्तीकर आघाडीवर
4000 मतांनी घेतली वायकरांच्या पुढे लीड
दक्षिण मध्य मुंबई
अनिल देसाई २१ हजार २१० मतांनी आघाडीवर
अनिल देसाई १ लाख २७ हजार १७२
राहुल शेवाळे १ लाख ५ हजार ९६२
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची चुरस वाढली
रवींद्र वयकरांच मताधिक्य केवळ २५८० वर
वायकरांना १,०५,५७१ मत, तर अमोल किर्तीकर यांना १,०२,९९१ मत
वायकरांच्या मताधिक्यात कमालीची कमतरता
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत २९ हजार ९०६ मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत ८७ हजार ५९८
यामिनी जाधव ५७ हजार ६९२
नोटा २३२३
ईशान्य मुंबई
संजय दिना पाटील - १ लाख २३ हजार ७५५
मिहीर कोटेचा - १ लाख १२ हजार ४८०
संजय दिना पाटील ११२७५ मतांनी आघाडीवर
उत्तर मुंबई 11 व्या फेरीनंतर
पियुष गोयल (भाजप) - 81344
+41268 मतांनी आघाडीवर
भूषण पाटील (काँग्रेस) - 40076
-41268 मतांनी पिछाडीवर
मुंबईतून कोण कोण आघाडीवर?
अरविंद सावंत - द. मुंबई
रवींद्र वायकर - वायव्य मुंबई
पियूष गोयल - उत्तर मुंबई
अनिल देसाई- द.मध्य मुंबई
उज्ज्वल निकम - उत्तर मध्य मुंबई
संजय दिना पाटील - ईशान्य मुंबई
पिछाडीवर कोण?
यामिनी जाधव- द. मुंबई
अमोल किर्तीकर- वायव्य मुंबई
भूषण पाटील- उत्तर मुंबई
राहुल शेवाळे- द. मध्य मुंबई
वर्षा गायकवाड- उत्तर मध्य मुंबई
मिहीर कोटेचा- ईशान्य मुंबई
सकाळी 10.30 वाजता हाती आलेल्या कलानूसार-
उत्तर मुंबई - 10 व्या फेरीनंतर
पियुष गोयल (भाजप) - 75143
+36744 मतांनी आघाडीवर
भूषण पाटील (काँग्रेस) - 38399
-36744 मतांनी पिछाडीवर
चौथ्या फेरीनंतर अनिल देसाई ६ हजार ५४७ मतांनी आघाडीवर
अनिल देसाई ८२ हजार ९५५
राहुल शेवाळे ७६ हजार ४०८
मुंबई उत्तर मध्य
उज्वल निकम मत ७९१७७ मत
वर्षा गायकवाड ६४३०८ मत
उज्वल निकम १४८५९ मतांनी आघाडी
उत्तर पश्चिम मुंबई
रविंद्र वायकर - ४५३७१
अमोल किर्तीकर - ३९८९६
वायकर ५४७५ मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत: 25134
यामिनी जाधव:19052
6082 मतांनी अरविंद सवांत आघाडीवर...
ईशान्य मुंबई
संजय दिना पाटील - ६२१६७
मिहीर कोटेचा - ४५१३५
संजय दिना पाटील १७०३२ मतांनी आघाडीवर
उत्तर मुंबई
पियुष गोय (भाजप) - 59445
+31077 मतांनी आघाडीवर
भूषण पाटील (काँग्रेस) - 28368
-31077 मतांनी पिछाडीवर
सकाळी 10 वाजता हाती आलेल्या कलानूसार
ईशान्य मुंबई
संजय दिना पाटील - ४२४६२
मिहीर कोटेचा - २६२७३
संजय दिना १६१८९ मतांनी आघाडीवर
राहुल शेवाळे ४७८ मतांनी आघाडीवर
राहुल शेवाळे ४३ हजार १२१
अनिल देसाई ४२ हजार ६४३
उत्तर पश्चिम मुंबई
अमोल किर्तीकर - १२४३३
रविंद्र वायकर - १२६४१
वायकर २०८ मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत २ हजार ७२९ मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत १५ हजार ४४०
यामिनी जाधव १२ हजार ७११
उत्तर पश्चिम मुंबई
पहिली फेरी
अमोल किर्तीकरांना ४ हजार ५७६ मतं
रविंद्र वायकर यांना ३ हजार ४१४ मतं
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना १ हजार १६२ मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबई
राहुल शेवाळे ३७ हजार ६७२
अनिल देसाई ३५ हजार १५८
राहुल शेवाळे २ हजार ५१४ मतांनी आघाडीवर
ईशान्य मुंबई - पहीली फेरी
संजय दिना पाटील - २४३७७
मिहीर कोटेचा - १४०३३
ठाकरे गटाचे उमेदावार संजय दिना पाटील १०३०४ मतांनी आघाडीवर
ईशान्य मुंबई -
संजय दिना पाटील ७९२१ मतांनी आघाडीवर
उत्तर मुंबई-
पियुष गोयल (भाजप) - २३३७०
१२३५२ मतांची आघाडी
भूषण पाटील (काँग्रेस) - ११०१८
नोटा - ४५४
पहिल्या फेरीत दक्षण मुंबईतून यामिनी जाधव आघाडीवर
31-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ मिळालेली फेरीनिहाय मते
1. अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 19955
2. मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी 196
3. यामिनी यशवंत जाधव – शिवसेना 22978
4. अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी 196
5. मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी 89
6. राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी 53
7. सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी 40
8. अरविंद नारायण सावंत – अपक्ष 163
9. मनिषा शिवराम गोहिल – अपक्ष 38
10. प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष 23
11. मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष 12
12. मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष 20
13. शंकर सोनवणे – अपक्ष 43
14. सबीहा खान – अपक्ष 70
15. नोटा –
सकाळी 9.15 वाजताच्या कलानूसार-
दक्षिण मुंबईतून सध्या यामिनी जाधव आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर दक्षिम मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर आहे.
दक्षिण मुंबई
यामिनी जाधव 4059
अरविंद सावंत 3320
यामिनी जाधव 739 मतांनी आघाडीवर
दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे: 6722
अनिल देसाई: 1106
दक्षिण मध्य मुंबईत नोटाला ६१४ मतं
अनिल देसाई 5616 मतांनी पिछाडीवर
सकाळी 8.30 वाजताच्या कलानूसार-
मतमोजणीच्या पहिल्या कलानूसार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार मुंबईत ठाकरे गटाने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. सकाळी 8.30 वाजता आलेल्या कलानूसार मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आणि 2 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने दिनांक २ जून २०२४ रोजी सकाळी ६:०० ते दिनांक ५ जून २०२४ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत शिवडी येथील मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस उपायुक्त (अभियान) बृहन्मुंबई यांनी निर्गमित केले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.
जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती
सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.