मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Lok Sabha Result 2024) निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि वायव्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.
उत्तर मुंबईत महायुतीचा विजय-
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल विरुद्ध भूषण पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये पियूष गोयल यांचा ३,५०,९२१ मतांनी विजय झाला आहे.
दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंचा विजय-
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. अनिल देसाईंनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव केला. अनिल देसाई 53 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत.
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांचा विजय
दक्षिण मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांनी पराभव केला.
वायव्य मुंबईत अमोल किर्तीकर यांचा विजय-
वायव्य मुंबईत ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा विजय झाला आहे. अमोल किर्तीकर यांनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा पराभव केला. अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली.
उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय-
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला आहे.
ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील यांचा विजय-
ईशान्य मुंबई (Mumbai North East Lok Sabha) मतदारसंघात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी विजय मिळवला आहे. संजय दिना पाटील यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यात चुरस रंगली होती. त्यानंतर संजय दीना पाटील यांनी आघाडी घेत मिहीर कोटेचा यांचा पराभव केला.