मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला (MVA) मिळालेल्या यशाबद्दल शरद पवारांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.  शरद पवार म्हणाले उत्तर प्रदेशच्या जनतेनं अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मर्यादित आघाडीनं जागा मिळाल्या आहेत. उत्तर प्रदेशात आणि हिंदी भाषिक पट्ट्यात आमच्याकडून आणखी काळजी घेतली जाण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.  


मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सीताराम येचुरी यांच्यासह इतरांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीनं जाऊ आणि पुढचं धोरण आम्ही सामुहिक पणे ठरवू, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंतराव पाटलांच्या नेतृत्त्वात आम्ही जागा मर्यादित लढलो, आम्ही 10 जागा लढलो, त्यापैकी 7  जागांवर आघाडीवर आहोत. 10 जागा लढून 7 जागा जिंकणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं स्ट्राईक रेट चागंलं आहे, असं शरद पवार म्हणाले. 


आम्ही महाविकास आघाडी केली त्याचं यश आहे. काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचं देखील आहे. आम्हाला जसं यश मिळालं, तसंच काँग्रेस आणि शिवसेनेला यश मिळालं, असं शरद पवारांनी म्हटलं. पुढील काळात देखील आम्ही देखील एकत्रित पणे काम करु, असं शरद पवार म्हणाले. 


मी चंद्रबाबू नायडू किंवा इतरांशी बोललेलो नाही. मी मल्लिकार्जून खरगे आणि सीताराम येचुरी यांच्याशी बोललो, असं शरद पवार म्हणाले. 


बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत विचारलं असता शरद पवारांनी उमेदवारांना विचारा असं म्हटलं. बारामतीत वेगळा निकाल लागेल, असं मला वाटलं नव्हतं. बारामती विधानसभा मतदारसंघात माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. बारामतीमधील मतदार योग्य निर्णय घेईल, असा विश्वास होता, असं शरद पवार म्हणाले. 


महाविकास आघाडीच्या वतीनं सामुहिक विचार करुन आणि चर्चा करुन लोकांच्या समोर जाणार आहोत. हा निकाल आम्हाला प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवारांनी म्हटलं. 


मध्यप्रदेशात आम्हाला  अधिक काम करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. उत्तर प्रदेशातील जनतेनं आमच्या मित्रपक्षांना साथ दिली, असं शरद पवार म्हणाले. 


संबंधित बातम्या : 


Kolhapur Loksabha Election Result : कोल्हापुरात मान आणि मत गादीलाच; शाहू महाराजांची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल


ओमराजे निंबाळकरांची विजयाच्या दिशेनं वाटचाल,1 लाखाहून अधिक मताधिक्य, अर्चना पाटलांना धक्का बसण्याची शक्यता