Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत येणार असल्याची चिन्हे आहेत. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच या यशाचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे असल्याचे बोलले जात आहे. आज त्यांच्या वाढदिवस असून काँग्रेसमध्ये दुहेरी आनंदोत्सव केला जात आहे. अशातच आज नाना पटोले यांचे राज्यात ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले आहे.
नाना पटोले यांचा भंडाऱ्यात उत्साहात वाढदिवस साजरा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस. काल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष ठरला. नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. नानांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्याच्या त्यांच्या सुकळी गावात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून नेते मंडळी दाखल झाले. भंडारा - गोंदियाचे आणि गडचिरोली - चिमूरचे नवनिर्वाचित खासदार यावेळी त्यांच्या असंख्य समर्थकांसह नानांच्या भेटीला पोहोचलेत. यावेळी नाना समर्थकांनी नाना पटोले भावी मुख्यमंत्री या आशयाचा त्यांच्या फोटोसह केक नाना पाटील यांच्या हस्ते कापून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला.
काँग्रेसचे विजयी उमेदवार कोणते?
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 17 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय. काँग्रेसचे कोण कोणते उमेदवार विजयी झाले? जाणून घेऊयात.
सोलापूर प्रणिती शिंदे विजयी
कोल्हापूर शाहू महाराज विजयी
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर विजयी
गडचिरोली चिमूर नामदेव किरसान विजयी
नांदेड वसंतराव चव्हाण विजयी
उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड विजयी
रामटेक श्यामकुमार बर्वे विजयी
नंदूरबार गोवाल पाडवी विजयी
लातूर शिवाजीराव काळगे विजयी
धुळे शोभा बच्छाव विजयी
भंडारा गोंदिया प्रशांत पडोळे विजयी
अमरावती बळवंत वानखेडे विजयी
जालना कल्याण काळे विजयी
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने 17 जागा लढवल्या होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर शड्डू ठोकला होता. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 21 जागा लढवल्या होत्या. दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादीने सध्या 8 जागांवर आघाडी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या