पुणे : राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवांरांचा पराभव केला. शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) यांच्या लढतीत बारामती कुणाची याचा फैसला बारामतीकरांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Election Result) सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी मोठं मताधिक्य घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवार ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी 47 हजाराहून जास्त मतधिक्य घेतलं आहे. अजित पवारांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जातेय.


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार नवीन चिन्ह तुतारीसह निवडणुकीला सामोरं गेले. त्यातच अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उतरवलं. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांनाही पटला नसल्याचं आता निकालातून दिसलं. सर्व नेते अजित पवारांसोबत, पण जनता मात्र शऱद पवारांसोबत असं चित्र दिसून आलं.


बारामती लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत, तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. 


बारामती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी 


एकूण झालेले मतदान - 14 लाख 12 हजार 875


सुप्रिया सुळे एकूण मतदान - 7 लाख 32 हजार 312


सुनेत्रा पवार एकूण मतदान - 5 लाख 73 हजार 979


दौंड विधानसभा (राहुल कुल- भाजप) 


सुप्रिया सुळे -92 हजार 64 
सुनेत्रा पवार - 65 हजार 727 


(लीड सुप्रिया सुळे 26 हजार 337) 


इंदापूर (दत्ता भरणे- राष्ट्रवादी अजित पवार) 


सुप्रिया सुळे - 1 लाख 14 हजार 20
सुनेत्रा पवार - 88 हजार 69


(लीड सुप्रिया सुळे 25 हजार 951)


बारामती ( अजित पवार) 


सुप्रिया सुळे -1लाख 43 हजार 941
सुनेत्रा पवार - 96 हजार 560


(लीड सुप्रिया सुळे 47 हजार 381)


पुरंदर (संजय जगताप- काँग्रेस) 


सुप्रिया सुळे -1लाख 25 हजार 948
सुनेत्रा पवार - 90 हजार 667


(लीड सुप्रिया सुळे 35 हजार 281)


भोर (संग्राम थोपटे- काँग्रेस आमदार)


सुप्रिया सुळे -1लाख 34 हजार 245
सुनेत्रा पवार - 90 हजार 440


(लीड सुप्रिया सुळे 43 हजार 805)


खडकवासला (भीमराव तापकीर- भाजप)


सुप्रिया सुळे - 1लाख 21हजार 182
सुनेत्रा पवार - 1लाख 41हजार 928


(लीड सुनेत्रा पवार 20 हजार 746)


बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी एकूण मिळवलेले मताधिक्य - 1 लाख 58 हजार 333


ही बातमी वाचा: