Samriddhi Highway Accident : अपघातांच्या (Accident) मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. यात महामार्गावर कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. नाशिक वरून कोलकाताकडे डाळिंब घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बुलढाणा नजीकच्या शेलगाव देशमुखजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचा चालक आणि वाहक गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातानंतर ट्रकने पलटी खालली असून ट्रकचे मोठे नुकसानही झाले आहे. तर अपघातानंतर ट्रकमधील डाळिंबाच्या पेट्या जवळील गावातील नागरिकांनी पळविल्या असल्याचेही बघायला मिळाले आहे.  


कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटला


नाशिकवरुन कलकत्ता येथे डांळीब घेऊन जाणारा ट्रक डोणगांव जवळ एका छोट्या कार ला वाचवण्याच्या प्रयत्नात पलटी झाला. ही घटना आज 1 जूनला पहाटे 3.30 च्या दरम्यान घडली. हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिकवरुन ट्रक क्र. WB23F 6538 हा डांळीब घेऊन कोलकाताकडे समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Expressway) जात होता. दरम्यान, डोणगांव जवळ शेलगाव देशमुख अंडरपास पुलाजवळ एक छोटी कार भरधाव वेगाने येऊन ओव्हर टेक करत होती. दरम्यान ट्रक चालकाने अचानक आलेला कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकवरील नियंत्रण गमावले.


ग्रामस्थांनी अपघातनंतर डाळिंबाच्या पेट्या पळवल्या


त्यानंतर ट्रक बाजूचे कठडे तोडून अंडरपासच्या भिंतीला धडकून पलटी झाला.  यामध्ये चालक आणि वाहक दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात जर अंडरपासची भिती नसती तर ट्रक थेट खाली शेलगाव देशमुख रस्त्यावर पडला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, ट्रक चालकाने प्रसंगावधान राखात परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी जीवितहाणी टळली आहे. व्रृत्त लिहीपर्यंत पोलीस स्टेशन डोणगावला कोणतीही माहिती नव्हती. 


आज शिरुर तालुक्यातही अशीच एक अपघाताची घटना घडली आहे. पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरुर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (वय 15) मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये (Pune Accident) दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा गंभीररित्या जखमी झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या