ABP Cvoter Exit Poll Lok Sabha Election Result 2024लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) 4 जूनला लागणार आहे. त्याआधी एक्झिट पोल (Exit Poll) समोर आला आहे. निकालाआधी देशाच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे, याचा एबीपी सी वोटरचा सर्वात अचूक एक्झिट पोल समोर आला आहे. या निवडणुकीतही भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकसह दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचं दिसत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्येही भाजपला मोठं यश मिळाल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात महायुतीला फटका बसल्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप खातं उघडण्याचा अंदाज

केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजप खातं उघडण्याची शक्यता आहे. ABP-CVoter च्या एक्झिट पोलमध्ये केरळमध्ये एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर यूडीएफला 17 ते 19 जागा, तर एलडीएफला आणि इतरांना शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात इंडिया आघाडीला 1 ते 3 जागा मिळण्याचा तर एनडीएला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोलमध्ये तेलंगणामध्ये एनडीएला 7 ते 9 जागा, इंडिया आघाडीला 7 ते 9 जागा आणि इतरांना 0 ते 1 जागा मिळत आहेत. टक्केवारीमध्ये एनडीएला 33 टक्के, इंडिया आघाडीला 39 टक्के, बीआरएसला 20 टक्के, एआयएमआयएमला 2 टक्के आणि इतरांना 6 टक्के मते मिळाल्याचा अंदाज आहे. 

आंध्र प्रदेशात एनडीएला 53 टक्के, भारतीय आघाडीला 3 टक्के, वायएसआरसीपीला 42 टक्के आणि इतरांना 2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जागांचा आकडा पाहिल्यास एनडीएला येथे बहुमत मिळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात 21 ते 24 जागा एनडीएच्या खात्यात जाणार आहेत. तर, वायएसआरसीपीला 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशमध्ये इंडिया आघाडी आपले खातं न उघडण्याची शक्यता आहे.

एबीपी सी वोटर एक्झिट पोलचे आकडे समोर

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज अखेर संपलं आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलं असून आता 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. निवडणुकीचं रणशिंग फुंकताना भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचा विश्वास असून एनडीएने 400 पार चा नारा दिला. तर सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. इंडिया आघाडीने भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत 300 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला.

ABP Cvoter Exit Poll : एबीपी सी वोटरचा एक्झिट पोल

राज्य   इंडिया आघाडी एनडीए आघाडी इतर एकूण
अंदमान निकोबार 0   1 1
आंध्र प्रदेश 0 21 ते 25 0 ते 4 25
अरुणाचल प्रदेश 0 2 0 2
आसाम 2 ते 4 10 ते 12 0 14
छत्तीसगढ 0 ते 1 10 ते 12 0 11
दादरा नगर हवेली 0 1 0 1
दमण-दीव 0 1 0 1
दिल्ली  1 ते 3 4-6 0 7
गोवा 1 1 ते 2 0 2
गुजरात 1 25 ते 26 0 26
हरियाणा 4 ते 6 4 ते 6 0 10
जम्मू काश्मीर 0 ते 2  1 ते 2 2 ते 3 5
कर्नाटक 3-5 23-25 0 28
केरळ 17-19 1-3 0 20
लडाख  0-1 0 0 1
लक्षद्वीप 0-1 0 0 1
मध्य प्रदेश 1-3 26-28 0 29
महाराष्ट्र 23-25 22-26 0 48
मणिपूर 1 1-2 0 2
मेघालय 1 1-2 0 2
मिझोराम 0 1 1 1
नागालँड 1 1 0 1
पुदुच्चेरी 1 0 0 1
राजस्थान 2-4 21-23 0 25
सिक्कीम 0 1 0 1
तामिळनाडू 37-39 0-2 0 39
तेलंगणा 7-9 7-9 0-1 17
त्रिपुरा 0 2 0 2
उत्तराखंड 0 4-5 0 5
  97 ते 118 187 ते 226 3 ते 9 328

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय?

मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वात एनडीएने दोन वेळा मोठ्या फरकाने निवडणुका जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपला बहुमत मिळालं होतं. 2019 मध्ये भाजपने 303 जागांवर विजय मिळवला होता, तर एनडीएला 351 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 52 जागांवर विजय मिळाला होता. याउलट UPA ला फक्त 90 जागांवरच विजय मिळवता आला होता. 

लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल आकडेवारी पाहा

पक्ष जागा मतदानाची टक्केवारी
भाजप 303 37.30%
काँग्रेस 52 19.46%
टीएमसी 22 4.06%
बसपा 10 3.62%
सपा 5 2.55%
वाईएसआर काँग्रेस 22 2.53%
डीएमके 24 2.34%
शिवसेना 18 2.04%
जदयू  16 1.45%

 

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Lok Sabha Election Result Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट; एक्झिट पोल काय सांगतो, पाहा