एक्स्प्लोर

साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात, निवडणुकीत दिसलं : शरद पवार

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 294462 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना 366721 मतं मिळाली.

मुंबई : साताऱ्याच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर आहे. या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात हे या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, असा टोला शरद पवारांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना लगावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडत खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे साताऱ्याच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.

'मान गादीला, मत राष्ट्रवादीला' अशी घोषणा देत राष्ट्रवादी साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उतरली होती. राष्ट्रवादीच्या घोषणेला साद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने कौल दिला. सातारच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर असून या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव सातारकरांनी केला आहे. श्रीनिवास पाटलांना विजयी केल्याबद्दल  साताऱ्याला जाऊन तिथल्या जनतेचे आभार मानणार आहे, असं शरद पवारांनी सांगितले.

Satara Loksabha Bypoll | शरद पवार भिजले, उदयनराजे हरले!

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 294462 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना 366721 मतं मिळाली. तर अभिजीत बिजुकले यांची पत्नी अलंकृता बिचुकले यांना केवळ  855 मतं मिळाली.

सत्ता येते जाते मात्र पाय जमीनीवर ठेवावे लागतात, भाजप-शिवसेनेला टोला 

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही. राजकरणात सत्ता येते जाते मात्र पाय जमीनीवर ठेवावे लागतात, अशी टीका शरद पवारांनी भाजप-शिवसेनेवर केली. सत्तांतर केलेल्या नेत्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, काही अपवाद वगळता सत्तांतर केलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारलं आहे. जे पक्ष सोडून गेले, त्यांना अनुकूल निकाल नाही.

दिवाळी झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक होणार आहे. तसेच मित्रपक्षाबरोबरही बैठक घेणार आहे. यापुढे अधिक जोमाने पक्ष उभारणीसाठी काम करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्याबद्दल शरद पवारांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget