एक्स्प्लोर

288 जागांच्या विधानसभेत यंदा 24 महिला आमदार!

24 पैकी सर्वाधिक म्हणजे 12 महिला आमदार भाजपच्या आहेत. तर काँग्रेसच्या पाच आमदार निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार विधानसभेत दिसतील.

मुंबई : 288 सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत यंदा 24 महिला आमदार दिसणार आहेत. यंदाच्या एकूण 235 महिला उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यापैकी 24 महिला आमदारांचा विजय झाला आहे. 24 पैकी सर्वाधिक म्हणजे 12 महिला आमदार भाजपच्या आहेत. तर काँग्रेसच्या पाच आमदार निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार विधानसभेत दिसतील. याशिवाय दोन अपक्ष महिला आमदारही विधानसभेत आपापल्या मतदारसंघाचा आवाज बुलंद करतील. महिलांना 33 टक्के आरक्षण पण.... खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास 95 महिला आमदार असणं अपेक्षित आहे.  2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून हा आकडा 24 वर पोहोचला आहे. विधानसभेच्या आजवरच्या इतिहासात हा सर्वाधिक आकडा आहे. 1962 मध्ये 13 महिला आमदार विशेष म्हणजे 1962 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 महिला आमदार निवडून आल्या होत्या. मात्र 2019 च्या निवडणुकीपर्यंत महिला आमदारांची संख्या 20 च्या पुढे जाऊ शकलेली नव्हती. यंदा 24 महिला आमदार निवडून आल्या असल्या तरी 33 टक्के आरक्षणाचा आकडा गाठण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिला मतदार जास्त पण आमदार कमी महाराष्ट्रात एकूण 8.97 मतदार आहेत. त्यापैकी 4.38 कोटी महिला आहेत. या हिशेबाने जवळपास 50 टक्के महिला मतदारांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अजिबातच उत्साहजनक नाही. राजकीय पक्ष समाज आणि देशातील महिलांची स्थिती बदलण्याचा दावा करतात परंतु, राजकारणात, विशेषत: निवडणुकीत हा बदल दिसत नाही. 12 विद्यमान आमदार पुन्हा विजयी यंदाच्या निवडणुकीत 12 विद्यमान महिला आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत. यापैकी आठ आमदार भाजपच्या तर तीन काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीच्या आहेत. यात मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि सुमनताई पाटील यांचा समावेश आहे. विधानसभेत पहिल्याच जाणाऱ्या 12 महिला आमदार विधानसभेत पहिल्यांदाच निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये सरोज अहिरे, अदिती तटकरे, लता सोनावणे, यामिनी जाधव, मुक्ता टिळक, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, गीता जैन आणि मंजुळा गावित यांचा समावेश आहे. विधानसभेतील 24 महिला आमदार भाजपच्या महिला आमदार 1. मंदा म्हात्रे - बेलापूर 2. मनिषा चौधरी - दहिसर 3. विद्या ठाकूर - गोरेगाव 4. भारती लव्हेकर - वर्सोवा 5. माधुरी मिसाळ - पर्वती 6. मुक्ता टिळक - कसबापेठ 7. देवयानी फरांदे - नाशिक मध्य 8. सीमा हिरे - नाशिक पश्चिम 9. श्वेता महाले - चिखली 10. मेघना बोर्डीकर - जिंतूर 11. नमिता मुंदडा - केज 12. मोनिका राजळे - शेवगाव शिवसेनेच्या महिला आमदार 1. यामिनी जाधव - भायखळा 2. लता सोनवणे - चोपडा काँग्रेसच्या महिला आमदार 1. वर्षा गायकवाड - धारावी 2. प्रणिती शिंदे - सोलापूर मध्य 3. प्रतिभा धानोरकर - वरोरा 4. सुलभा खोडके - अमरावती 5. यशोमती ठाकूर - तिवसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार 1. सरोज अहिरे - देवळाली 2. सुमनताई पाटील - तासगाव-कवठेमहंकाळ* 3. अदिती तटकरे - श्रीवर्धन अपक्ष महिला आमदार 1. गीता जैन, भाजप बंडखोर - मीरा-भाईंदर 2. मंजुळा गावित - साक्री

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget