एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : महायुतीला साताऱ्यातून मतांचं भरभरुन दान, मंत्रिमंडळ विस्तारातही मानाचं स्थान, जिल्ह्याला चार मंत्रिपदं

Satara Politics : सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघात महायुतीला जोरदार यश मिळालं. साताऱ्यातून महायुतीचे 8 आमदार विजयी झाले.

सातारा : महायुतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळवलं. महायुतीला मित्रपक्षांसह 236 जागांवर विजय मिळाला. महायुतीला राज्यातील सर्व भागातून प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, माण, फलटण या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सातारा जिल्ह्यातून भाजपचे चार आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेनं दोन जागांवर विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या. महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात  साताऱ्यातून भाजपमधून शिवेंद्रराजे भोसले नाव निश्चित झालं आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे देखील मंत्री होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील यांचं नाव निश्चित झालं आहे.

साताऱ्याला मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्रिपदं 

सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या तीन घटकपक्षांकडून प्रत्येकी  एका आमदाराला याप्रमाणं संधी दिली जाण्याची शक्यता होती ती खरी ठरली आहे. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीच्या आमदारांसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली होती. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद देण्यात यावं अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याशिवाय शिवेंद्रराजे भोसले राज्यातून दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. त्यामुळं त्यांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर होतं, भाजपनं त्यांना मंत्रिपदासाठी फोन केला आहे. जयकुमार गोरे यांचं नाव देखील निश्चित झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे.  जयकुमार गोरे माण विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपच्या चिन्हावर ते विजयी झाले आहेत. 

शंभूराज देसाईंना पुन्हा मंत्रिपद 

पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हॅटट्रिक करत विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये  ते राज्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी होती. ते उत्पादन शुल्क मंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. 

मकरंद पाटील देखील शपथ घेणार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून देखील साताऱ्यात एक मंत्रिपद दिलं जाणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा मकरंद पाटील यांना देखील मंत्रिपद मिळणार होतं. मात्र, त्यावेळी ते शक्य झालं नव्हतं. यावेळी राष्ट्रवादीतून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्यानं मकरंद पाटील यांना संधी मिळाली आहे. 

इतर बातम्या : 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Embed widget