नागपूर :  इंडस्ट्रियल क्लस्टर...अॅग्रीकल्चर क्लस्टर..टेक्सटाईल क्लस्टर हे शब्द या आधी तुम्ही ऐकले असतील पण पॉलिटिकल  क्लस्टर ऐकलंय का? राज्य शास्त्राच्या अभ्यासक्रमात अद्याप ही संकल्पना आली नाही. मात्र भाजपच्या 'मिशन 144' मध्ये हा अभ्यासक्रम अॅड झाला आणि याच पॉलिटिकल क्लस्टरमधून महाराष्ट्रातल्या 18 मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय.


देशपातळीवर 'मिशन 144'


भारतीय जनता पक्षाने एका निर्धारित काळात निर्धातील लक्ष गाठण्यासाठी राजकारणात क्लस्टर पद्धतीने काम करायला सुरवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने देशपातळीवर 'मिशन 144' राबवताना या क्लस्टर पद्धतीने काम करायला सुरवात केली. या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करत क्लस्टर पद्धतीने काम करायला सुरवात केली होती. आता बदललेली परिस्थिती बघता संपूर्ण 48 लोकसभा मतदार संघ क्लस्टर पद्धती अंतर्गत आणण्यात आले. 


लोकसभा मतदारसंघ त्यांच्या जबाबदाऱ्या कुणाकडे?



  • चार लोकसभा मतदारसंघ मिळून एक क्लस्टर तयार करण्यात आले

  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई,मध्य मुंबई, पालघर,कल्याण हे चार लोकसभा मतदारसंघ देण्यात आले

  • केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे शिरूर शिर्डी बारामती व रायगड या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली

  • केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, म्हाडा व धाराशिव या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली

  •  केंद्रीय मंत्री  भूपेंद्र यादव यांच्याकडे,चंद्रपूर, हिंगोली बुलढाणा व औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची  जबाबदारी देण्यात आली

  •  तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हातकणंगले व कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली.

  • मात्र महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील लोकसभा कल्स्टरची संख्या पाचवरून 13 केली

  • महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदार संघ हे क्लस्टर अंतर्गत आणले आहे .


नव्याने तयार करण्यात आलेले आठ क्लस्टर?



  • अहमदनगर, बीड, लातूर  नांदेड या लोकसभा मतदार संघाचा कल्स्टर तयार करण्यात आला त्याची जबाबदारी ही तिर्थ सिंग रावत यांना देण्यात आली.

  • भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्ये मुंबई, उत्तर पूर्व मुंबई या लोकसभा मतदार संघाच्या कल्स्टरची जबाबदारी सि टी रवी यांना देण्यात आली 

  • रावेर, जळगाव , जालना, अकोला या लोकसभा मतदार संघाच्या क्लस्टरची जबाबदारी सदानंद गौडा यांना देण्यात आली 

  • भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर , नागपूर आणि वर्धा या लोकसभा मतदार संघाची जबाबदारी अरविंद भादुरीया यांना देण्यात आली 

  • धुळे, दिंडोरी, नंदुरबार या लोकसभा मतदार संघाच्या क्लस्टरची जबाबदारी ही कैलास विजयवर्गीय यांना देण्यात आली 

  • पुणे, सांगली व कोल्हापूर या लोकसभा मतदार संघ क्लस्टरची जबाबदारी केशव प्रसाद मौर्य यांना देण्यात आली 

  • बुलढाणा, संभाजीनगर, चंद्रपूर आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्यावर देण्यात आली 

  • ठाणे, नाशिक, मुंबई उत्तर पश्चिम व मावळ या लोकसभा मतदार संघाच्या क्लस्टरची जबाबदारी ही मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आली 

  • अमरावती, परभणी, रामटेक व यवतमाळ वाशीम या लोकसभा मतदार संघाच्या क्लस्टरची जबाबदारी हि गिरीश महाजन यांना देण्यात आली.


या क्लस्टर मध्ये भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला झालेल्या नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जोरदार जनसंपर्क अभियान सुरु आहे. सोबतच केंद्रे सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेच्या लाभार्थ्यांसोबत  विशेष संपर्क साधला जात आहे. बूथ स्तरापासून तर ब्लॉग स्तरापर्यंत  वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. सरल aap च्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जात आहे.  लोकसभा निवडणुकीपर्यंत हे चित्र असेच राहणार असून भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूक येईपर्यंत आणखी ताकदीने कल्स्टर पद्धतीवर काम करताना दिसेल असा एक  अंदाज व्यक्त केला जात आहे.


 भाजपने या क्लस्टर पद्धतीचा वापर करून सध्यातरी लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीत इतर सर्व पक्षाला मागे सोडले आहे. मात्र यावेळेस भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पेक्षा त्या  राज्यातील प्रादेशिक पक्ष कडवे आव्हान मिळत आहे. त्यामुळे 2019 तुलनेने 2024 ची लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल असेच चित्र दिसत आहे.