Urfi Javed : आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या  उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं पिझ्झाच्या स्लाइज पासून बनवलेला टॉप परिधान केलेला दिसत आहे. यासोबतच ती या व्हिडिओमध्ये पिझ्झा खातानाही दिसत आहे. उर्फीच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Continues below advertisement


उर्फी जावेदनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिझ्झाच्या स्लाइज पासून बनवलेल्या टॉपमध्ये दिसत आहे. तसेच उर्फीच्या हातात देखील एक पिझ्झा स्लाइज दिसत आहे. उर्फीने या व्हिडिओला कॅप्शन दिले-'Anyone ?'उर्फी जावेदनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर   नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


उर्फीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स 



उर्फीनं शेअर केलेल्या तिच्या या अतरंगी व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नाही, आम्हाला समोसा आवडतो, आम्ही देसी लोक आहोत.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जो विचार कोणी करणार नाही, तो विचार उर्फी करते.'


पाहा व्हिडीओ: 






अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर फोटोमुळे उर्फी ही चर्चेत असते.






उर्फीला इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन नेटकरी फॉलो करतात. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. उर्फीनं याआधी प्लास्टिक, वायर आणि काचांपासून तयार केलेला ड्रेस परिधान करुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Urfi Javed : अतरंगी ड्रेसिंग सेन्स अन् लग्झरी लाईफस्टाईल ; उर्फी जावेद आहे लाखोंच्या संपत्तीची मालकीन