एक्स्प्लोर

मोठी बातमी : कॅश कांडप्रकरणाच्या राड्यात हितेंद्र ठाकूरांनाच सर्वात मोठा धक्का, थेट उमेदवारचाच भाजपमध्ये प्रवेश

बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.  बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी (Suresh Padvi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Suresh Padvi join BJP : बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.  बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी (Suresh Padvi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची (Dahanu Assembly) उमेदवारी देण्यात आली होती . मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. 

सुरेश पाडवी यांचा भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा

दरम्यान, सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे.

विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप

एका बाजुला पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हा सर्व प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपनं मोठा डाव साधला आहे. डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय.

दरम्यान, उद्या (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशातच डहाणू विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. थेट  बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यामुळं हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच डहाणू विधानसभेत भाजपची ताकद वाढली आहे. सुरेश पाडवी यांनी भाजपच्या उमेदावारा आपला पाठिंबा देखील जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget