एक्स्प्लोर

19 आयारामांचा पराभव, शिवसेनेचे 11 तर भाजपचे 8 उमेदवार पराभूत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल 35 नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या 35 नेत्यांना दोन्ही पक्षांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या 35 नेत्यांपैकी 19 उमेदवारांचा पराभव झाला आहे.

मुंबई : राज्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. तसेच राज्यभरात युतीच्या बाजूने लाट होती. या लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल 35 नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या 35 नेत्यांना दोन्ही पक्षांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या 35 नेत्यांपैकी 19 उमेदवारांचा पराभव झाला आहे. पक्षबदलू नेत्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसनेतील पराभूत आयाराम राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघात पराभव झाला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला आहे. शिवसेनेत आलेल्या विजय पाटील यांचा वसई मतदारसंघात पराभव झाला आहे. शिवसेनेत आलेल्या संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघात पराभव झाला आहे. शिवसेनेत आलेल्या नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघात पराभव झाला आहे. माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे. भाजपमधील पराभूत आयाराम राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे. भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget